spot_img

घाटबोरी वनपरिक्षेत्रातील निंबा बिट मध्ये बिबट्याचा मृत्यू बिबट्याचा नैसर्गिक मृत्यू, अपघात की शिकार ! वनरक्षकासह वनपालाचे अवैध रित्या वृक्षतोड प्रकरणाची धास्ती ? 

मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)

घाटबोरी वनपरिक्षेत्रातील निंबा बिट मध्ये बिबट्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती शनिवारी उशिरा रात्री समोर आली आहे.या बाबत वनविभागाचे अधिकारी आज अकरा वाजेपर्यंत घटनास्थळी दाखल होणार असून मृत्यू कशामुळे झाला याची तपासणी करण्यात येणार आहे.

बिबटयाचा मृत्यू मेळजाणोरी शिवारात सदर घटना घडली असून दोन दिवसानंतर वनविभागाला समजले. त्यामुळे संबंधित वनपाल व वनरक्षक यांचे कार्यक्षेत्रात लक्ष नसल्याचे बोलल्या जात आहे.

शिवरात सुद्धा अवैध वृक्षतोड, व साग , व इतर वनस्पती झाडांची राजरोसपणे कत्तल सुरू आहे. यामुळे अधिकारी वर्ग यांच्या भेटी दरम्यान कोणकोणत्या गोष्टी समोर येणार हे पाहणे गरजेचे झाले आहे.

या संपूर्ण प्रकरणात निंबा बिट मध्ये बिबट्याचा झालेला मृत्यू हा नैसर्गिक आहे, अपघात आहे की शिकार! हे तपासणी दरम्यान कळणार आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या भेटी दरम्यान वनपाल. वनरक्षक व ईतर कर्मचारी धास्तावले चे वनविभागात बोलले जात आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या