spot_img

अकॅडेमीक स्कूल, गोमेधर ही शाळा या समाजातून निश्चितच सक्षम प्रशासकीय अधिकारी निर्माण करेल – ॲड. गणेश देवकर

अकॅडेमीक स्कूल गोमेधर द्वारा पंचेहत्तर मीटर लांबीच्या तिरंगा रॅलीचा मेहकर तालुक्यात विक्रम

मेहकर (अनिल मंजुळकर): सारस्वत बहुउद्देशीय संस्था, बुलढाणा द्वारा संचालित अकॅडेमीक इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, गोमेधरचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.दीपक नागरिक यांचे पाचशे आय.ए.एस. ऑफिसर्स तयार करण्याचे स्वप्न सदर शाळा निश्चितच पूर्ण करेल असा विश्वास ॲड.गणेशजी देवकर यांनी व्यक्त केला. ते बक्षीस वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी पंचेहत्तरव्या गणतंत्र दिनाचे औचित्य साधून आज पंचेहत्तर मीटर लांबीच्या तिरंग्याची विक्रमी प्रभात फेरी काढण्यात आली.

सदर तिरंगा यात्रेदरम्यान गोमेधरवासीयांनी पुष्पवृष्टी करुन, रांगोळ्या रेखाटून तथा महापुरुषांची भूमिका साकारलेल्या मुलांचे पूजन करून स्वागत केले. याप्रसंगी झेंडावंदन समारंभ संस्थेचे उपाध्यक्ष मा श्री मोहनराव वानखेडे पाटील यांचे हस्ते पार पडला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.दीपक नागरिक यांना जन्मभूमीचे पांग फेडण्यासाठी पंचक्रोशीतील सर्व नागरिक तथा पालक वर्ग अत्यंत हिरीरीने मदत करेल असे आश्वासन सर्वांच्या वतीने समाजोभिमुख पत्रकार निलेश नाहटा यांनी दिले.


या कार्यक्रमाला गोमेधर चे सरपंच पती सुभाष अवसरमोल, ग्रामसेवक श्री बारस्कर, गावातील प्रतिष्ठित नागरिक शिवसेनेचे नेते मदनराव होणे, यशस्वी उद्योजक गणेशजी देवकर, उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार अनिल मंजुळकर , शाळा समिती बारडा चे अध्यक्ष विनोद भाऊ घेवंदे, मौजे गोमेधर गावाचे प्रतिष्ठित नागरिक राहुल जाधव, सदर शैक्षणिक संकुलच्या प्रेरणास्थान मातोश्री शारदादेवी नागरिक, संस्थेच्या सचिव सौ. गीतादेवी नागरिक, प्राचार्य श्री सुनील कुटे, कोषाध्यक्ष श्री प्रल्हादजी हिवरकर, सदस्य श्री नितीन काळे, श्री मनीष सुळकर इत्यादी नागरिक तथा पालक वर्ग उपस्थित होते .

बक्षीस वितरणाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमेचे पूजनाने झाली. याप्रसंगी चिमुकल्यांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा साकारल्या. यामध्ये प्रामुख्याने विश्वजीत नागरिक यांनी लाल बहादूर शास्त्री,
योगेश्वरी ठोके हिने सावित्रीबाई फुले,पायल घेवंदे हिने रमाबाई,समृद्धी चुनडे द्वारा राजमाता जिजाऊ, सुरेंद्र ठोके यांनी महात्मा गांधी,यश पदमने याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिका अतिशय सुरेख पद्धतीने साकारल्या.

 

उपस्थितांनी क्रीडा सप्ताह मध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात दीपक नागरिक यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रशासनातील अधिकाऱ्यांची भूमिका समजावून सांगितली व या शाळेतील विद्यार्थी जरूर अधिकारी बनतील असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे संचालन विज्ञान शिक्षक सोज्वल वानखेडे व देशमुख मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन रोशनी घुमटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व संचालक मंडळ, प्राचार्य तथा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या