spot_img

गरिबाचे घरकुल मंजुरीसाठी दलाला मार्फत पैसे घेत असल्याचा गामसेवकांवर आरोप ? मेहकर तालुक्यातील मारोतीपेठ येथे चर्चेला उधाण!

मेहकर (अनिल मंजुळकर)

गरिबांना हक्काचे घरकुल मिळावेत म्हणून शासन प्रयत्नशील असतांना मेहकर तालुक्यातील मारोतीपेठ येथील गामसेवक दलाला मार्फत पैसे घेत असल्याचा आरोप करण्यात येत असल्याची चर्चा घरकुल धारकांमध्ये जोरदार चर्चिला जात आहे.

त्यामुळे सरपंच व उपसरपंच संबंधित गामसेवकावर काय कारवाई करतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
मेहकर तालुक्यातील मारोतीपेठ येथे गरिबांना घरकुल योजना राबविल्या जात आहे.

यामध्ये योजनेतील लाभार्थी ची यादी गावातील दलाला देऊन पैसे उकळण्याचा गोरख धंदा राजरोसपणे सुरू असल्याचे बोलल्या जात आहे.

त्यामुळे नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांनी गावात सुरू असलेल्या घरकुल व विहीर योजनेची दलाला मार्फत होणाऱ्या पैसे ची मागणी संदर्भात कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

मारोती पेठ येथील दलाल कोण? व ग्रामसेवकांच्या नावाचा वापर तर होत नाही ना ? याची सखोल चौकशी करण्याची मागणी गावातील जनता करत आहेत.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या