spot_img

बेशिस्त वाहणामुळे जानेफळकर त्रस्त , बाजाराच्या दिवशी ना पोलिस… ना होमगार्ड…. ना ठाणेदार…. मग कशावर पोलिस लक्ष ठेवतात ….?

मेहकर (अनिल मंजुळकर )

बाजाराच्या दिवशी भरगच्च वाहनांची वर्दळ. खेड्यापाड्यातील नागरिकांची, महिलांची बाजारात भाजीपाला व तिळ संक्रातीचे सामान घेण्यासाठी धावपळ अन् वाहनाच्या रागांच्या रांगा पण् या ठिकाणी ना.. पोलिस ना.. होमगार्ड… ना ठाणेदार… अशी गत जानेफळात पाहायला मिळाल्याने बेशिस्त वाहणामुळे जानेफळकरांना त्रास सहन करावा लागला आहे.

जानेफळात पासष्ट खेड्यापाड्यातील नागरिकांची व महिलांची बाजारात भाजीपाला घेण्यासाठी, कापड विकत घेण्यासाठी तर काही जण किराणा माल भरण्यासाठी येत असतात. विशेषतः जानेफळ मध्ये बैल बाजार व शेळ्यांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. लाखों रुपयांची उलाढाल होत असते.

 

तिळ संक्रांतीच्या महिलांना बोरं, साड्या बांगड्या, व भाजीपाला घेण्यासाठी गर्दी जमली आहे. बाजाराच्या दिवशी भुरटे चोर मोबाईल व दागिन्यांवर डल्ला मारण्यासाठी विशेष सक्रिय असतात. ठाणेदाराने बाजाराच्या दिवशी पोलिसांची नेमणूक केली नाही. गावातुन टिप्पर , मोठ्या विटांच्या वाहना, व ईतर वाहतूक जोमात सुरू असते. त्यामुळे वाहनाच्या रांगा लागल्या असतात. चौकात पोलिसांची नेमणूक करत नाही.

बाजाराच्या दिवशी ट्रॅफिक पोलिसांची विशेष वसुली जोमात सुरू असल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे बसस्थानकावर मोटारसायकलसह मोठ्या वाहनांची गर्दी जास्त असते. त्यामुळे बेशिस्त वाहणामुळे नागरिकांना व महिलांना जास्त त्रास होत असतो. या साठी जानेफळ चे ठाणेदार आजीनाथ मोरे बेशिस्त वाहणाकडे लक्ष देतील का ? अशी मागणी जोर धरत आहे. म्हणूनच बाजाराच्या दिवशी ना… पोलीस, ना… होमगार्ड, ना…ठाणेदार … मग कशावर पोलिस लक्ष ठेवतात… ? यावरून जनतेच्या मनात खलबत्त सुरू आहेत.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या