मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)
येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्या सोबतच पालावर राहून भटकंती जीवन करणाऱ्या कु. पल्लवी परिहार या विद्यार्थिनीचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव मानवतकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून व्हाईस ऑफ मिळण्याचे राज्य कार्यकारिणी सदस्य सिद्धेश्वर पवार, शहर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष जुगराज पठ्ठे, पत्रकार प्रवीण गायकवाड ,वाचनालयाचे अध्यक्ष रफिक कुरेशी प्रमुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी पालावर राहणाऱ्या व भटकंती जीवन जगणाऱ्या सपना परिहार यांची कन्या तसेच ज्ञानगंगा प्राथमिक आश्रम मंदिर खळेगाव येथे शिक्षण घेत असलेल्या कु. पल्लवी परिहार या गरीब विद्यार्थिनीच्या वाढदिवस केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकारांच्या वतीने तिला शैक्षणिक कामासाठी भेटवस्तू व रोख रक्कम देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पल्लवी परिहार या विद्यार्थिनीची आई ,आजी ,आत्या व पालावरील राहत असलेल्या गरीब मुलं मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावेळी लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. पालावरील जीवन जगत असलेल्या आणि जीवनात अत्यंत कमी आनंदाचे क्षण उपभोगणाऱ्या विद्यार्थिनीच्या वाढदिवस वाचनालयाच्या वतीने सादर करण्यात आल्याने वाचनालयाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.