spot_img

मुले गुणवान असून चालणार नाही तर पालकांना धनवान व्हावे लागेल…….. जयदीप पाटील सर

मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्तसेवा)

दीपस्तंभ फाउंडेशन जानेफळच्या वतीने आयोजित स्व. प्रल्हाद भाऊ देवकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यानमालेची सुरुवात दिनांक 10 जानेवारी बुधवार रोजी झाली असून, स्थानिक सरस्वती विदयालय तथा कनिष्ठ महा. येथे हा सोहळा रंगला. या व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवसाच्या अध्यक्षस्थानी श्री सरस्वती शिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती विजयाताई शरदअप्पा मिटकरी ह्या होत्या. तर उद्घाटक म्हणून सरपंच सौ रूपालीताई वडणकर तर ” बलशाली युवक बलशाली भारत ‘या विषयावर जयदीप पाटील सर, नोबल फाउंडेशन जळगाव यांनी विचार मांडले.

प्रमुख उपस्थिती म्हणून अमरसिंह राजपूत, प्रमोद बापू देशमुख बु. जी. अध्यक्ष ग्रा. प. संघ, सिद्धेश्वर पवार देशोन्नती, गजानन वडणकर पं. स. सदस्य, सेवाव्रती पंढरीनाथ शेळके हिवरा आश्रम, श्याम गट्टाणी सचिव, स. शी. समिती, संचालक दिनूअप्पा मिटकरी, संतोषराव तोंडे, श्यामभाऊ मुंदडा, नंदूअप्पा कापसे, संतोषभाऊ नाहटा, श्रीमती किरण चांदणे उपस्थित होते.

सुरवातीला दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. वादयवृंदाच्या साथीने शिक्षक भारत अवचार, सौ कल्पना फिरके, सचिन वाघमारे, पाटील यांनी स्वागतगीत गायले.त्यानंतर उपस्थित सर्व प्रमुख अतिथींचा दीपस्तंभ फाउंडेशनच्या वतीने चांगाडे सर, सत्तूभाऊ लाहोटी,मा. प्राचार्य दिलीप लामधाडे, मेहेत्रे सर, प्राचार्य धामोडकर यांनी सत्कार केला.पाथर्डी आणि पारखेड येथील बंजारा मुलींनी त्यांचे पारंपरिक बंजारा नृत्य सादर केले.तसेच सरस्वती परिवाराच्या वतीने संस्थेच्या पदाधिकारी यांनी पत्रकार यांना भेटवस्तू देऊन सत्कार केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रामदास धामोडकर यांनी सादर केले. त्यांनंतर स्थानिक पत्रकारांचा भेटवस्तू,पुस्तक, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुख्य वक्ते जयदीप पाटील सर यांनी विविध महान लोकांचे दाखले देत डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जीवनाची जडणघडण कशी झाली ते मांडले. येत्या काळात फक्त मुल गुणवान असून चालणार नाही तर त्याच्या पालकालाही धनवान व्हावे लागेल असे मत मांडले.

अभ्यास करून कोणालाही इजा झाली नाही मग तुम्ही अभ्यास करायचा कंटाळा का करता असा भावनिक प्रश्न त्यांनी विद्यार्थ्यांना विचारला. काही विद्यार्थ्यांनी त्यांना आपले प्रश्न विचारले. त्यानंतर त्यांच्यासोबत आलेले अमरसिंह राजपूत यांनी पैसा कमावणे ही काळाची गरज असून आर्थिक नियोजन कसे करावे याची विद्यार्थ्यांना माहिती दिली.

या कार्यक्रमाचे विध्यार्थ्यांना हसत ठेवत सूत्रसंचालन डॉ.कृष्णा हावरे यांनी तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य गजानन जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशासाठी दीपस्तंभ फाउंडेशन जानेफळ तसेच सरस्वती परिवार जानेफळ यांनी अथक परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या