spot_img

इसरूळ येथे जानकीदेवी महाविद्यालयाचे रासेयो शिबीराचे उद्घाटन अंढेरा ठाणेदार विकास पाटील यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चिखली (एकनाथ माळेकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)

भारत शिक्षण मंडळ द्वारा संचालित जानकीदेवी कनिष्ठ महाविद्यालयातील “राष्ट्रीय सेवा योजना” अंतर्गत दत्तक ग्राम इसरूळ येथे आयोजित ७ दिवसीय विशेष शिबिराचे उदघाटन सोमवार दिनांक २५ डिसेंबर रोजी जानकीदेवी विद्यालयाचे अध्यक्ष श्री शेणफडराव घुबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटक म्हणून इसरूळ चे सरपंच तथा चिखली तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष श्री सतीश पाटील भुतेकर हे तर या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक व वक्ते म्हणून अंढेरा पोलिस स्टेशन चे ठाणेदार विकास पाटील हे लाभले होते.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत गाडगेबाबा व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करून करण्यात आले. याप्रसंगी अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील हे स्वतः NSS चे विद्यार्थी राहिलेले असल्याने त्यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अशा शिबिराचे आयोजन केलेलं असते अशी माहिती सांगून आजचा तरूण विद्यार्थी कसा बिघडत चाललेला आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी अशा शिबिराच्या माध्यमातून मानसिक शुद्धता करून भविष्याचा वेध घेतला पाहिजे.

त्यासोबतच मुलींच्या बाबतीत बोलताना मुलींनी आपल्या आई-वडिलाच्या घामाचा विचार करून प्रत्येक पाऊल टाकले पाहिजे समाजात कसे वागणे गरजेचे आहे हे सांगून जानकी देवी विद्यालयाच्या अध्यक्षांच्या कार्याची स्तुती केली. यावेळी त्यानी आपला जीवनपट विद्यार्थ्यांन समोर मांडून आपण कसे रासेयो शीबीरातून घडलो हे समजावून सांगितले, त्या प्रसंगी इसरूळ चे सरपंच सतीश पाटील यांनी गावातील परिसर स्वच्छता करण्यासोबतच लोकांच्या मनातील वाईट विचाराची घाण सुद्धा साफ करण्याची किती गरज आहे.

हे समजावून सांगून आपल्या गावाविषयी दूरदृष्टीकोण कसा असला पाहिजे यावर सुद्धा त्यांनी आपले मत मांडले, त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पांडुरंग पाटील भुतेकर यांनी आजच्या विद्यार्थ्यांची पावले चुकीच्या दिशेने कशी पडत आहेत यावर प्रकाश टाकून या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संस्काराची शिदोरी घेता येईल असे मत व्यक्त केले, अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यालयाचे अध्यक्ष शेणफडरावजी घुबे यांनी आपल्या काळ किती खडतर होता, त्यामधून जीवनाचा प्रवास अतिशय चिकाटीने आणि ध्येय वेडे होऊन यश कसे प्राप्त करता येईल यावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांनी रासेयो शिबिरामधून संस्काररूपी शिदोरी घ्यावी व भविष्याच्या दृष्टिकोनातून एक एक पाऊल पुढे टाकावे व समाजामध्ये आपले व आपल्या शाळेचे व आई-वडिलांचे नाव रोशन करावे अशा शुभेच्छा विद्यार्थ्यांना दिल्या.

या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणुन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पांडुरंग पाटील भुतेकर .माजी संचालक ओमप्रकाश भुतेकर. ग्रा. पं.सदस्य भिकनराव भुतेकर. तंटामुक्ती अध्यक्ष कृष्णा काळे. शाळा समिती अध्यक्ष विठ्ठल पाटील भुतेकर. पोलीस पाटील श्री जयपाल वायाळ. जि.प.शाळेचे मुख्याध्यापक बंगाळे सर, शिक्षक खेडेकर सर. सोनवणे सर. व जानकी देवी विद्यालयाचे प्राचार्य हरिदास घुबे सर यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक गजानन मिसाळ यांनी मांडले तर सूत्रसंचालन कु. कोमल वरपे आणि प्राजक्ता गावडे हिने केले तर आभार प्रा.उद्धवराव घुबे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी संतोष मिसाळ दिलीप थुट्टे, डी.व्ही थुट्टे व प्रा, डुकरे प्रा.पूनम घुबे मॅडम यांनी सहकार्य केले याप्रसंगी गावातील अनेक प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या