spot_img

कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर महिलांना सोडले वाऱ्यावर नातेवाईक संतप्त, स्थानिक डॉक्टर फरार ? नातेवाईकांचा आरोप ! अंढेरा येथील आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर?

दे/राजा: (एकनाथ माळेकर)

देवळगाव राजा तालुक्यातील अंढेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रकिया झाल्यानंतर आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर हजर नसल्याचा धक्कादायक प्रकार २४डिसेंबर रोजी रात्री घडला सदर प्रकाराबाबत महिलांच्या नातेवाईक तथा महिलांनी ओरड केल्यानंतर प्रसार माध्यम प्रतिनिधी यांनी भेट दिली असता तेथे कुठलेच जबाबदार आधिकारी उपस्थित नसल्याचे दिसून आले व त्यानंतर प्रसार माध्यम प्रतिनिधी यांनी येथे कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नसल्याने सदर प्रतिनिधी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांना सुद्दा भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला असता त्यांनी सुद्दा फोन न उचलण्यात धन्यता मानली.

त्यानंतर सदर प्रतिनिधी यांनी या प्रकाराची आपबीती सांगण्यासाठी भ्रमणध्वनीवर जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांना संपर्क साधला असता त्यांनी तातडीने सदर प्रकरणात लक्ष घालून निगरगट्ट झोपेचे सोंग घेतलेले व निरागस महिलांच्या जीवाशी खेळ सुरू असतांना त्यानी तातडीने संबंधित विभागाला अवश्य त्या उपाय योजना करण्याचे आदेश दिले त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रसार माध्यम प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधून या प्रकाबाबत आपबीती सांगितली तर त्यातून सत्य बाहेर आले कार्यरत आरोग्य अधिकारी हे सुट्टीवर गेलेले आहेत असे त्यांनी सांगून त्यांची सुट्टी ही १७ डिसेंबर रोजी संपली असतांना ते हजर झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर पर्यायी डॉक्टर शिवानंद शिंगाडे यांना पाठविण्यात आले मात्र ते सुद्दा रात्री आठ वाजता येऊन दहा वाजता परत गेल्याने महिला व नातेवाईक यांना मनस्ताप सहन करावा लागला तसेच या अगोदर जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोंणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्दा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ठेवण्यात आल्या त्या ठिकाणी २०महिला पात्र ठरल्या होत्या व सदर महिलांना वीस तास उपाशी पोटी ठेवून त्या ठिकाणी डॉक्टर आलेच नव्हते त्या नंतर सर्जरी साठी खाजगी डॉक्टर बोलावून सर्जरी करण्यात आली होती.

ही या घटनेची शाही वाळत नाही तर अंढेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टर यांनी उपस्थित राहणे आवश्यक असतांना त्यानी त्याठिकाणी उपस्थित राहण्यास टाळाटाळ करणे हे रुग्णांच्या नातेवाईक मंडळी यांना मनस्ताप सहन करावा लागणारे ठरले असून तसेच सेवानगर येथे डेंगू सदृश रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा त्याठिकाणी सुद्दा संबंधित रुग्णांना उपचार करून सुट्टी झाल्यानंतर प्रसार माध्यमातून त्या डेंगूसदृश्य रुगण्याच्या नातेवाईक यांनी आरोग्य विभागावर नाराजी व्यक्त केली व हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर एक दिवस त्या ठिकाणी भेट देऊन अवघ्या काही वेळातच पथक परतले होते व त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी जाण्यास पथकाला वेळ सुद्दा मिळाला नाही.

तसेच वातावरणात झालेल्या बदलाने अनेक गावखेड्यात रुग्ण संख्या वाढत असतांना आरोग्य विभाग याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असून जबाबदार सुद्दा त्यांना पाठीशी घालत असल्याचे वास्तव दिसून येत असून या आरोग्य केंद्राच्या हद्दीतील उपकेंद्रांची सुद्दा ही अवस्था असतांना या ठिकाणी ‘तेरी भी चूप मेरी भी चूप हा प्रकार सुरू आहे म्हटल्यास वावगे ठरू नये एवढे मात्र खरे!.

“अंढेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार गंभीर असुन गैरहजर असणारे वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या गंभीर स्वरूपाची कार्यवाही करण्यात येईल “!

अमोल गिते
जिल्हा आरोग्य अधिकारी बुलढाणा

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या