spot_img

जुगार खेळतांना माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास चवरे ला अटक, ठाणेदार अमरनाथ नागरेची धाडसी कारवाई !

मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)

डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम भोसा येथे गुप्त माहिती वरून ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने जुगारावर रेड करुन 3 आरोपी व 23 हजाराचा मुद्दे माल दि. 23 डिसेंबर जप्त करुन एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास चवरे यांचा सुध्दा समावेश आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हकिकत अशाप्रकारे आहे कि,दि. 23 डिसेंबर ला सायंकाळी पाच वाजून 40 मि. दरम्यान भोसा येथे वेळी मिळालेल्या गुप्त बातमीनुसार यातील आरोपी कैलास मोतीराम चवरे वय 40 वर्ष सतोष भिका टाले वय 30 वर्ष प्रताप मधुकर फुफाटे बय 34 वर्ष सर्व भोसा ता. मेहकर यांच्या वर पंचासमक्ष जुगार रेड केला असता तो पैशाचे हरजितवर लोकांकडुन पैसे घेवुन त्यांना वरली मटका नावाचा जुगार खेळताना व खेळवितांना मिळुन आला त्याचे अंगझडतीत 1. संतोष भिका टाले याचे कब्जात नगदी 420-/ रु व एक रिअलमी कंपनीचा काळया रंगाचा मोबाइल एक सिमकार्ड असलेला जिओ नं 8080818916 कि 10,000/-रू, एक वरली मटका जुगार आकडे लिहलेली चिठठी कि00 व एक डा०ट पेन किं.05/-रु व 2. प्रताप मधुकर फुफाटे याचे कब्जात नगदी 210/-रु एक रेडमी 9 प्राइम कंपनीचा मोरपंखी कलरचा एक सिमकार्ड जिआ कंपनीचे नं 9356347515 कि. 12,000/-रू व 3. कैलास मोतीराम चवरे याचे कब्ज़ात नगदी 540/-रु असा एकुण 23,175/-रुचा जुगार माल मिळुन आला आरोपी विरूद्ध कलम अप क्र.339/2023 क 12 (अ) म.जु.का. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका संजय घिके करीत आहेत.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या