मेहकर(अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्तसेवा):
मेहकर तालुक्यातील दुधा या गावात झालेल्या धाडसी घरफोडीत तब्बल ४ लाख १५ हजारांचा ऐवज लंपास झाला असुन बिनधास्तपणे घरातील लाडू खाऊन पळ काढल्याची घटना घडली आहे. यामुळे मेहकर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी जानेफळ पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी गुन्हा दाखल केला आहे. दुधा येथील प्रेमकुमार रामराव सास्ते हे आपल्या परिवारासह घरात झोपले होते. यावेळी अज्ञात चोरट्यानी घराचे मागील दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
यानंतर कपाटमधील ४० हजार रुपये आणि सोन्याचे दागिने असा ४ लाख १५ हजारांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. बुलढाणा येथील श्वान पथक आले असता काहीच सुगावा लागला नाही .प्रकरणी भादवीच्या कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला .