चिखली:- (एकनाथ माळेकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)
(दि. १४/१२/२०२३. पोलीस स्टेशन रायपुर हददीतील सैलानीबाबा दर्गा येथे दररोज देशभरातुन हजारो भावीक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे दर्गा व परीसरात मोठया प्रमाणावर गर्दी झालेली असते त्या गर्दीचा फायदा घेवुन चोरटे भांवीकांचे मोबाईल व इतर वस्तुवर हात साफ करतात, अश्याचप्रकारे दि. १२/१२/२३ रोजी घडलेल्या घटनेमध्ये फिर्यादी सादुल्ला हुसेन मोहम्मद ताहेर अली वय ४९ वर्षे रा बालानगर, रंगारेडी आंध्रप्रदेश यांनी फिर्याद दिली की, ते दर्शनासाठी सैलानीबाबा दर्गा येथे आलेले होते. ते दर्शन घेत असतांना त्याचे पॅन्टचे खिशातुन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अॅपल कंपनिचा १ लाख रूपये किंमतीचा मोबाईल काढुन नेला आहे.
नमुद फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला अप के २७३/२०२३ कलम ३७९ भांदवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील आरोपी अज्ञात असल्याने गुन्हयाचा योग्य तपास करणे असल्याने ठाणेदार दुर्गेश राजपूत तसेच तपासी अमंलदार तसेच पोलीस स्टाप असे तात्काळ घटनास्थळावर पोहचले.
त्यांनतर ठाणेदार यांनी केलेले मार्गदर्शन, गुप्त माहिती व तांत्रीक तपासाव्दारे संशयीत आरोपी हा बुलडाणा शहर पोलिस स्टेशन हददीतल असल्याचे समजले त्यगुनसार ठाणेदार राजपूत व पोलीस स्टाप असे पोलीस स्टेशन बुलडाणा शहर येथे जावुन तेथील डिबी पथक यांचे मदतिने गुन्हयातील आरोपी सोहिल सययद इस्माईल वय २० वर्षे रा. इक्बाल चौक, जवाहर नगर, बुलडाणा याला ताब्यात घेतले.
आरोपीची चौकशी केल्यानंतर त्याने गुन्हा कबुल केला तसेच गुन्हयात चोरीला गेलेला अॅपल कंपनिचा १ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल त्याचेकडुन जप्त करण्यात आला आहे. तरी सदरचा गुन्हा दाखल झालेपासुन १२ तासाच्या आत गुन्हयातील नमुद आरोपी याला मुददेमालास अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगीरी हि रायपुर पोस्टेचे सफौ. राजेश गवई, आशिष काकडे, राजु गव्हाणे, अरूण झाल्टे, राहुल जाधव, देवीदास दळवि, शेख अक्तर यांनी व बुलडाणा शहर पोलीस स्टेशन च्या डिबी पथकातील पोउपनि दिलीप पवार, पोलीस अमंलदार गजानन जाधव, युवराज शिंदे, विनोद बोरे व शिवहारी सांगडे यांनी केलेली आहे. तसेच आरोपीकडुन बुलडाणा जिल्हयातील मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे. असा विश्वास ठाणेदार श्री. दुर्गेश राजपूत यांनी व्यक्त केला आहे.