spot_img

मेहकर एमआयडीसी मध्ये एकही उद्योग सुरू नाहीत, मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण तरीही मंत्र्यांचे आदेश असतानाही अधिकारी अतिक्रमण काढत नाही! आमदार संजय रायमुलकर यांची विविध प्रश्नांवर विधानसभेत मागणी

मेहकर – ( नागेश कांगणे. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)

येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केलेले असून मंत्र्यांच्या आदेशानंतरही अधिकाऱ्यांनी ते हटविले नसून ते त्वरित हटवावे व उद्योगाना भूखंड उपलब्ध करून द्यावेत ,अशी मागणी आमदार संजय रायमूलकर यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली आहे .

पुरवणी मागण्या मांडताना मेहकर मतदार संघातील अनेक समस्यांना त्यांनी वाचा फोडली . मेहकर एम आय डी सी मध्ये एकही उद्योग सुरू नसून मोठ्या प्रमाणावर लोकांनी अतिक्रमण केलेले आहे .मंत्र्यांनी आदेश देऊनही अधिकाऱ्यांनीते काढले नाही.ते काढावे व उद्योगांना भूखंड उपलब्ध करून द्यावेत ,अशी मागणी आ रायमूलकर यांनी केली .

लोणार येथे २२० के व्ही वीज उपकेंद्र मंजूर असून त्याचे काम सुरू न झाल्याने वीज भारनियमनाचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे ,असे सांगून त्यांनी मेहकर लोणार तालुक्यातील ८ अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवून द्यावेत , १०० के व्ही रोहित्र , ५० के व्ही मंजूर झालेले असूनही ते बसविण्यात न आल्याने उपलब्ध ट्रान्सफॉर्मर वर अतिभार झालेला असून त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्याचे रायमूलकर यांनी सांगितले .

मेहकर येथे वीज कंपनीचे उपविभागीय कार्यालय तीन तालुक्यांसाठी सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला असून ते कार्यान्वित करावे ,अशीही मागणी त्यांनी केली .जलजीवन योजनेतील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या प्रस्तावात त्रुटी आहेत त्या पाणीपुरवठा मंत्रालयाने पूर्ण करून घेऊन योजनांना गती द्यावी ,असे रायमूलकर म्हणाले .लोणी लव्हाळा पाणीपुरवठा योजनेतील वाढीव काँक्रीटीकरण मंजूर करावे , जानेफळ कळंबेश्वर योजनेच्या डीपीआर मध्ये त्रुटी असल्याने पाणीपुरवठा योजनेचे काम लांबले आहे. त्याही त्रुटी खात्याने त्वरित पूर्ण करून घेण्याची त्यांनी प्रभावी मागणी त्यांनी केली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या