spot_img

चिखली तालुक्यातील भालगाव येथील सौ.अलका राजपूत यांची दिव्यांग संस्थेच्या माध्यमातूनऑलम्पिक साठी राज्यस्तरावर निवड.

चिखली (एकनाथ माळेकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)

चिखली तालुक्यापासून जवळच असलेल्या भालगाव येथील सौ.अलका प्रशांत चव्हाण या महिलेचा बुलढाणा जिल्हास्तरीय प्यारा ऑलम्पिक असोसिएशन नगरपरिषद खामगाव व, विराट मल्टीपर्पज फाउंडेशन दिव्यांग संस्थेच्या माध्यमातून जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित भालाफेक, थाळीफेक, गोळा फेक, कबड्डी, व तिन चाकी सायकल. अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दि. १०/१२/२०२३ रोजी खामगाव येथे जिल्हास्तरीय ऑलिम्पिक क्रीडा निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये सौ. अलका प्रशांत चव्हाण (राजपूत) हिने गोळा फेक, व थाळीफेक, या दोन्ही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला असून बुलढाणा जिल्ह्याचे तालुक्याचे व भालगाव गावचे नावलौकिक केले असून सौ. अलका प्रशांत चव्हाण यांची राज्यस्तरीय निवड करण्यात आली आहे त्यांच्यावर सर्व क्षेत्रातून चव्हाण परिवारावर पुढील वाटचालीच्या यशासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या