spot_img

रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा – डॉ. हेमराज लाहोटी मराठा प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर लाहोटी यांचा वाढदिवस साजरा तर मारोतराव सुरोशे व सतीश पाटील तेजनकर यांचा सत्कार समारंभ संपन्न.

मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)

दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी छत्रपती कला क्रीडा व सामाजिक बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित मराठा प्रतिष्ठान सुलतानपूरच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये माजि पंचायत समिती उपसभापती तथा प्रख्यात अर्धांग वायू तज्ञ डॉ. हेमराज लहोटि यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.तर भाजपा किसान मोर्चा बुलढाणा जिल्हा सरचिटणीस मारोतराव सुरोशे व उपाध्यक्ष सतीश पाटील तेजनकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला.

यावेळी मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राम कडूकर यांच्या कार्यालयावर सायंकाळी आठ वाजता कार्यक्रम सुरू झाला.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र दळवी तर प्रमुख पाहुणे विश्वनाथ हरकळ,मधुकर भानापुरे व मनोहर भानापुरे हे होते.यावेळी सर्व सत्कार मूर्तींचे उपस्थित सर्वांतर्फे भव्य सत्कार करण्यात आला.

विश्वनाथ हरकळ यांनी यावेळी सत्कारमूर्तींवर प्रकाश टाकत सर्वांना आपल्या मधुर शब्दसुमनाने शुभेच्छा दिल्या तर डॉक्टर लाहोटी यांनी रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा असून सुलतानपूर हे गाव सर्व सुलतानपूर मधील डॉक्टरांच्या मदतीने रुग्णसेवेसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध करणार असल्याचे सांगितले.

मारोतराव सुरुशे यांनी मिळालेल्या पदाचा सदुपयोग करून पक्ष वाढीसाठी व परिसरातील विकासासाठी आयुष्य खर्ची करणार असल्याचे सांगितले.तर सतीश पाटील तेजनकर यांनी आपल्या भाषणातून पक्षश्रेष्ठींनी दाखविलेल्या विश्वासाला तडा न जाऊ देता शेतकऱ्यांसाठी व सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस झटणार असल्याचे सांगितले अध्यक्षीय भाषणात डॉक्टर दळवी यांनी सर्वांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर राम कडूकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल भोसले यांनी केले.कार्यक्रमाला विशेष उपस्थिती मध्ये डॉ.वाघ,डॉ.गारडे,डॉ.जाधव, संजाब खरात,राजेश भानापुरे, पंजाबराव बोबडे साहेब,ऍडव्होकेट अवचार, विष्णू पवार, मयूर सरकटे, ग्रा.प.सदस्य अनंता टाकले,पोलीस राजेश जाधव यांच्यासह मराठा प्रतिष्ठानचे अनेक सदस्य हजर होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या