मेहकर – (नागेश कांगणे. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)
सिद्धहस्त पत्रकार ,लेखक व सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश्वर पवार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण व जीवन गौरव पुरस्कार महात्मा कबीर समता परिषदेने जाहीर केला आहे.
तज्ज्ञांची समिती राज्यभर फिरून पुरस्कारांसाठी योग्य व्यक्तींची निवड करते .समितीतर्फे यावर्षी २५ डिसेंम्बर रोजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत .सिद्धेश्वर पवार हे रा ना पवार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष,पत्रकार , विदर्भ साहित्य संघाच्या मेहकर शाखेचे सचिव आहेत.
स्वर्गीय अरविंद उमाळकर वृद्धाश्रमाचे उपाध्यक्ष आहेत .व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या देशपातळीवर कार्य करणाऱ्या संघटनेचे ते राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत .करोना काळात सर्वत्र ऑक्सिजन चा तुटवडा होता ,ही बाब पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कानावर घातली तेंव्हा त्यांनी जिल्ह्यसाठी १३ कॉनसंनट्रेटर दिले .दैनिक आधुनिक केसरी मध्ये गोडवा हा साप्ताहिक स्तंभ ते लिहितात .
उत्कृष्ट सूत्रसंचालन ,प्रभावी वक्ता म्हणून सिद्धेश्वर पवार यांची ओळख असून अनेक मुख्यमंत्री, मंत्री , मराठा क्रांती मोर्चाच्या सभांचे त्यांनी यशस्वी सुत्रसंचालन केलेले आहे .येत्या २५ डिसेंम्बर रोजी त्यांच्यासह इतर पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत . दीपक केसरकर आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार वितरीत होणार आहे. सामाजिक, शैक्षणिक , पत्रकारिता यामधील उल्लेखनीय कार्याबद्दल पवार यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे .सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे .