spot_img

मराठी पत्रकार परिषदेच्या 85व्या वर्धापनदिनानिमित्त पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी……

 

मेहकर अनिल मंजुळकर रोखठोक न्यूज वृत्त सेवा)

मराठी पत्रकार परिषदेच्या 85व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद आष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी पत्रकार परिषदेचे अमरावती विभागीय सचिव अमर राऊत, अंबिका परिवाराचे संस्थापक, सामाजिक कार्यकर्ते मोहन पाटील धोटे आणि अंबिका मल्टिस्पेसिऍलिटी हॉस्पिटलचे यांच्या संयुक्त विद्यमाने जानेफळ येथील पत्रकार बांधवांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

सुरवातीला पत्रकार डॉ.कृष्णा हावरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले.
त्यानंतर जेष्ठ पत्रकार सैय्यद महेबूबभाई, मनीष मांडवगडे,अनिल मंजुळकर,रवींद्र वाघ, डॉ.श्रीकृष्ण काकडे, कृष्णा हावरे,मनीष वानखेडे,अंकुश वानखेडे, विष्णू वाकळे,विशाल फितवे, विजय केदारे,सचिन वाळके ,सागर गव्हाड यांच्या ई सी जी सह, रक्त व इतर सर्व तपासण्या करण्यात आल्या.

यावेळी कार्यक्रमाला जीवन पाटील धोटे,मोहन पाटील धोटे, डॉ. नितीन राम मारोडकर, लघुलेखक अभय फितवे, रामभाऊ शेळके,अमोल धोटे सर, विलास धोटे,विशाल धोटे, अमोल धोटे, रुपेश धोटे उपस्थित होते.

या आरोग्य तपासणीसाठी डॉ.नितीन मारोडकर, डॉ. प्रशांत काळे,
अमोल राठोड, शेख उमर, अभिषेक निकम, गौरव नाईकवाडे, अंबिका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व ऋषीकृपा मेडिकल स्टोअर्सच्या सर्व कर्मचारी बांधवांनी अथक परिश्रम घेतले. प्रीती भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पत्रकार अमर राऊत यांनी केले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या