spot_img

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित सन्मान सोहळा संपन्न

लोणार -(अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकिय, पत्रकारीता व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष निकम हे होते.

प्रमुख उपस्थितांमध्ये लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार निमिष मेहेत्रे,नगर उपाध्यक्ष बादशहा खान,न.पा.गट नेते भुषण मापारी, नगरसेवक उबेद खान,केला सर, शिवछत्र मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष नंदू भाऊ मापारी,पांडुरंग सरकटे, साहेबराव पाटोळे,व्हाईस ऑफ मीडिया तालुका अध्यक्ष पत्रकार उमेश कुटे, वंचित चे नागवंशी संगपाल पनाड,उ.बा.ठा.जिल्हा संघटक डॉ गोपाल बच्छीरे,बि .आर.एस.चे ता.अध्यक्ष प्रकाश नागरे,भा.ज.पा.चे गजानन मापारी, विजय मापारी , बाबाराव गीते,यांच्यासह राजकीय,व्यापारी, सामाजिक,वैद्यकिय, शासकिय,अधिकारी मोठ्या संख्येने इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळि शंभरहून अधिक मान्यवरांचा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष शेख सजाद , लोणार तालुका अध्यक्ष उद्धव आटोळे,शहर अध्यक्ष फीरदोश खान,उबेद कुरेशी, शिवाजी घायाळ, विनायक कुटे, सतीश मुलंगे, गणेश कुटे,जगण मोरे,साहिल खान, सुरेश मोरे, गजानन नागरे, दिनकर काकड, शेख चांद,राम पाटील व त्यांच्यासह इतरांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या