चिखली (एकनाथ माळेकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)
चिखली तालुक्यातील अंत्रि खेडेकर येथे ०४ डिसेंबर २०२३ वार सोमवार मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ वा वर्धापनदिन आहे. त्यानिमित चिखली तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने जिल्हातील सर्व पञकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
सोमवारी (दि. ०४) सकाळी दहा वाजता, या शिबिराचे उद्घाटन चिखली तहसील चे तहसीलदार मा.कव्हळे साहेब, प्रमुख पाहुणे म्हणून अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा. विकास पाटील, चिखली तालुका कृषी अधिकारी माननीय ज्ञानेश्वर सवडदकर साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चिखली तालुका आरोग्य अधिकारी विशाल रेंगे साहेब, मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया पत्रकार परिषद यांचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्हाध्यक्ष अनिलजी उंबरकर, जिल्हा संघटक नारायणजी दाभाडे, शेगाव तालुका मराठी पत्रकार परिषदेचे संघाचे सचिव नंदू कुलकर्णी, विभागीय सचिव अनिल राऊत यांच्या उपस्थितीत तज्ञ डॉक्टर व महिला डाॅ. मार्गदर्शन व आरोग्य तपासणी करणार आहेत.
तसेच नागरिकांचे राहिलेले आधार कार्ड अपडेट , भारत आयुष्यमान कार्ड, पी एम किसान योजना, यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावरील मार्गदर्शन प्रत्येक विभागाचे तज्ञ करणार आहेत. सर्व पत्रकार बंधू, भगिनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लाभ घ्यावा असे आवाहन डिजिटल मीडिया परिषद चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व सर्व सन्माननीय पदाधिकारी यांनी केले आहे.
आरोग्य शिबीरचे ठिकाण . प्राथमिक आरोग्य केंद्र अंत्री खेडेकर, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा रविवार दि .०४ डिसेंबर २०२३ रोजी सोमवार ला सकाळी १०ते दुपारी ०२ वाजे पर्यंत. तरी जास्तीत जास्त पत्रकारांनी व नागरीकांनी या रोग निदान शिबीरचा , आधार अपडेट, आयुष्यमान भारत कार्ड तसेच पीएम किसान योजनेचा
पत्रकार, दैनिक, साप्ताहिक, ऑनलाईन चॅनेलच्या सर्व पत्रकार बंधू, भगिनींनी व नागरीकांनी आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित राहून या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा वरील सर्व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मराठी पत्रकार परिषद सलग्न डिजिटल मीडिया परिषद चिखली तालुकाध्यक्ष सुनिल अंभोरे, उपाध्यक्ष कैलास देशमुख, सचिव एकनाथ माळेकर, सहसचिव भिकनराव भुतेकर, प्रसिद्धी प्रमुख कैलास आंधळे, कार्याध्यक्ष राधेश्याम काळे, कोषाध्यक्ष शेषराव जाधव तथा सर्व सन्माननीय तालुका पदाधिकारी यांनी केले आहे.