spot_img

दैनिक सेवाशक्ती टाइम्सचा वर्धापनदिन थाटात संपन्न…… सेवारत्न पुरस्काराने वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर सन्मानित…..

 

मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)

1डिसेंबर 2023रोजी मेहकर येथून जवळच असलेल्या हॉटेल परिवार या ठिकाणी अल्पावधीत नावारूपास आलेल्या दैनिक सेवाशक्ती टाइम्सचा वर्धापन दिन मोठ्या थाटात संपन्न झाला असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा. प. संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बाप्पू देशमुख हे होते.

मागील 2/3दिवसांपासून राज्यात पावसाला सुरवात झाली असल्यामुळे, कार्यक्रम होणार नाही असे असतांना ठरलेल्या वेळेपेक्षा 1तास उशिरा कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी
प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रशांत राठोड, माजी सभापती जी. प. बुलढाणा राजेंद्र पळसकर, मेहकर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ता उमाळे,युवा उद्योजक किशोर गारोळे, मनसे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव जाधव,ठाणेदार प्रवीण मानकर जानेफळ, ठाणेदार अमरनाथ नागरे डोणगाव,रमेश कांबळे दु. निबंधक, श्रेणी 1‌.भाजपचे सारंग माळेकर, पत्रकार परिषद अमरावती वि. सचिव अमर राऊत, जेष्ठ पत्रकार सैय्यद महेबूबभाई, मा. पं. स. सदस्य गजानन वडनकर,संपादक गजानन काटे,सेवाशक्ती टाइम्सचे मुख्य संपादक अंकोश राठोड,मानद संपादक ऍड. किशोर पांचाळ,सौ. जयश्री पारिस्कर, संदीप गवई संस्थापक तथागत ग्रुप, शंकर पवार उपस्थित होते.


दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. दैनिक सेवाशक्ती टाइम्सचा एक वर्षाचा दैदीप्यमान प्रवास वृत्तसंपादक फिरोज शहा वाशीमकर यांनी विशद केला.
वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी कार्य करणाऱ्या डॉ. प्रशांत राठोड, डॉ विजय चऱ्हाटे, डॉ. करुणा पेंटेवाड, डॉ. अझहर शेख यांना सेवारत्न पुरस्कार
देऊन, तर युवा उद्योजक ऋषांक चव्हाण यांना सेवा रत्न पुरस्कार देऊन त्यामध्ये सन्मानचिन्ह, भेटवस्तू, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
दैनिक सेवाशक्ती टाइम्सच्या वेगवेगळ्या विभागामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गजानन सरकटे, फिरोज शहा, किसन लाटे, कृष्णा हावरे, शेख कदीर, अनिल दराडे सतीश तेजनकर, नासिर शेख, भागवत चव्हाण यांना पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात आले.

त्यानंतर मेहकर तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंचसौ रुपाली गजानन वडणकर, जानेफळ सौ. विद्याताई खुरद, कळमेश्वर, सौ. शैलजा गजानन गवई मा. पेठ, सौ. विमलताई वानखेडे, बेलगाव, सौ. पुष्पाताई देशमुख, सौ साधना पवार, राजकुमार पाखरे घाटबोरी,यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या सत्कारानंतर दै. देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी अमर राऊत यांनी पत्रकार बांधवांच्या व्यथा कथन करून सर्वांना भावनिक केले.

त्यानंतर राज्यभरातून आलेल्या दैनिक सेवाशक्ती टाइम्सच्या सर्व प्रतिनिधींना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ. प्रशांत राठोड, दत्ता पाटील उमाळे, राजूमामा पळसकर यांनी सदर वृतपत्राच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
उपस्थित पत्रकार, मनिष मांडगवडे, संपादक कैलास राऊत, रोखठोक न्यूज चे संपादक अनिल मंजुळकर,निलेश नाहटा,फिरोज शहा ,सैय्यद हरून, श्रीकृष्ण काकडे, रवींद्र गायकवाड, सागर गव्हाड, विशाल फितवे,ज्ञानेश्वर इंगळे, हमीद मुल्लाजी,सादिक कुरेशी, नारायण पचेरवाल, भगवान राईतकर, सुनील मोरे, मुन्ना काळे, सुनील ठक, राम शेळके, असिफ मिर्झा, रवी सवडतकर यांचाही सत्कार करण्यात आला.


या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कृष्णा हावरे तर आभार प्रदर्शन सतीश तेजनकर यांनी केले.
प्रीतीभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्य संपादक अंकुश राठोड, कार्यकारी संपादक गजानन सरकटे, वृत्त संपादक फिरोज शहा, निवासी संपादक किसन लाटे, उपसंपादक समाधान देशमुख , कृष्णा हावरे ,मनोज चव्हाण, सतिश तेजनकर,शेख कदीर,नवल राठोड,यांनी अथक परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या