spot_img

मेहकरात आरक्षण पादयात्रेचं जल्लोषात स्वागत अनुसूचित जातीच्या अ ब क ड वर्गीकरणासाठी १३ डिसेंबर रोजी नागपूर ला धडकणार लाखो मातंगांचा मोर्चा , कैलास खंदारे यांची पोतराजाची भूमिका ठरली शहरवासीयांचे आकर्षण ! आक्रोश व्यक्त करण्यासाठी अर्ध नग्न युवकांचा आरक्षण यात्रेत सहभाग

 

मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा )

अनुसूचित जातीमधील प्रत्येक समाज घटकाला आरक्षणाचा लाभ मिळावा; यासाठी  अनुसूचित जातीचे अ ब क ड वर्गीकरण करण्यात यावे. या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी लहु शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू  कसबे यांच्या मार्गदर्शनात व प्रांत अध्यक्ष कैलास खंदारे यांच्या नेतृत्वात पुणे ते नागपूर पदयात्रा काढण्यात आली आहे या यात्रेचे २ डिसेंबर रोजी शहरात आगमन होताच ढोल ताशाच्या निनादात विविध संघटनांच्या माध्यमातून जल्लोषात स्वागत करण्यात आले.

मातंग समाजासह अनुसूचित जातीतील सर्व समाज घटकाच्या आरक्षणाविषयी न्याय मागणीसाठी ही पदयात्रा पुणे येथून मार्गस्थ झाली मेहकर पर्यंत या यात्रेने 500 किलोमीटरचा टप्पा गाठला आहे नागपूरपर्यंत ही पदयात्रा साडेआठशे किलोमीटरचा प्रवास करून १३ डिसेंबर रोजी या आरक्षण पदयात्रेचे लाखोच्या भव्य मोर्चा रूपांतर होणार आहे. या मोर्चामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे’अ ब क ड ‘वर्गीकरण करण्यात यावे यासह
बार्टीच्या धरतीवर आर्टीची स्थापना करण्यात यावी, क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या सर्व ६८ शिफारशींची पूर्तता करण्यात यावी, गत दहा वर्षापासून बंद असलेले अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ  सुरुकरुन पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात यावा.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, मुंबई विद्यापीठाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे, गंज पेठ पुणे येथे क्रांतिवीर लहुजी साळवे यांनी सुरू केलेली पहिली क्रांती शाळा स्मारक करण्यात यावी, लहुजी साळवे व अण्णाभाऊ साठे यांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यात यावे, तसेच आरक्षण योध्दा अंकुश खंदारे त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी व या कुटुंबाला दहा लाख रुपयाची मदत मिळावी.

या मागण्यांचा समावेश असणार आहे.येथील लोणार फाटा येथे स्वागत झाल्यानंतर या पदयात्रेला शहरातून सुरुवात झाली. यात संघटनेचे प्रांताध्यक्ष कैलास खंडारे यांनी पोतराजाचा वेश धारण केल्याने हे या पदयात्रेचे विशेष आकर्षण ठरले. तर मातंग समाजाला आत्तापर्यंत योग्य न्याय मिळत नसल्या चा रोष व्यक्त करण्यासाठी युवक अर्ध नग्न होऊन या पदयात्रेत सहभागी झाले होते.

या वेळी विष्णू कसबे कैलास खंदारे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आपल्या संवेदना व्यक्त केल्या. स्थानिक शिवाजी उद्यान येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ सदर आरक्षण पदयात्रेचे सभेमध्ये रुपांतर झाले या ठिकाणी शिवसेना शहर प्रमुख (उ.बा.ठा) किशोर गारोळे तसेच भाजपाचे प्रल्हाद पिटकर यांनी विष्णू कसबे व कैलास खंदारे यांचे यथोचित स्वागत केले.

यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून १३डिसें. रोजी हिवाळी अधिवेशना दरम्यान नागपूर होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. वामनराव भिसे, साहेबराव पाटोळे ,संतारामजी तायडे, ज्ञानदेव मानवतकर ,बबनराव रत्नपारखी, एम. आर. तौर, दीपक कांबळे, विनोद दुतोंडे, कैलास थोरात ,रमेश बोरकर डी.एन.डोंगरदिवे, महादेव बावरे ,महादेव लिंगायत ,सुनील दळवी, विष्णू शेलारकर, दीपक लगड ,मोहनराज दुतोंडे ,विलास निकाळजे ,सागर बोरकर, रवी पवार, हेमंत खंदारे, राजू नेमाडे, तुषार नेमाडे, प्रभाकर आवारे, सुलोचना दुतोंडे सह समाजातील स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या