मेहकर (अनिल मंजुळकर )
मेहकर तालुक्यातील ग्राम लोणी काळे येथील डेंगू ताप ने 18 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना 28 तारखेला घडली. हर्षल गणेश पोपळघट असे या मुलाचे नाव आहे. त्याच्यावर संभाजीनगर येथे उपचार सुरू होते.
हर्षल ला सात-आठ दिवसापासून ताप आला होता. स्थानिक जानेफळ येथील खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले होते. ताप कमी होत नसल्यामुळे हर्षल ला खाजगी दवाखान्यात जाणेफळ व संभाजी नगर येथे भरती करण्यात आले होते. तब्येतीमध्ये सुधारणा होत नसल्याकारणाने हर्षल ला संभाजीनगर येथे भरती करण्यात आले होते. हर्षल च्या मेंदूत ताप गेल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
उपचाराला हवा तसा प्रतिसाद देत नसल्याकारणाने उपचारादरम्यान मंगळवार सकाळी मृत्यू झाला. सायंकाळी च्या सुमारास लोणी काळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. हर्षल च्या मृत्यू ने लोणी काळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.