मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)
25/26 नोव्हेंबर 2023 ला खेलो मास्टर्स गेम असोसिएशन महाराष्ट्र व श्री.शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती यांच्या वतीने शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती वर्ष 125 निमित्ताने राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये प्रा.एन.डी.पाटील माध्यमिक विद्यालय हिवरा खुर्द ता.मेहकर जि.बुलढाणा येथे क्रीडा शिक्षक पदावर कार्यरत असलेले गोवर्धन राठोड यांनी मैदानी स्पर्धेत सहभाग नोंदवलेला होता.
50+ वयोगटात लांब उडी या खेळ प्रकारात 5.30 मी.लांब उडी मारुन राज्यातुन व्दितीय क्रमांक पटकाविला असुन सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे.
आजप्रर्यंत त्यांनी बरेच विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकविले आहेत.कबड्डी या खेळात शाळेला नॅशनल गोल्ड मेडल विजेते खेळाडू दिलेले आहेत.राज्यस्तरावर भरपूर विद्यार्थी मेडल प्राप्त आहेत.
ते स्वतः कबड्डी खेळाचे राष्ट्रीय खेळाडू आहेत.राज्यस्तरिय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्राप्त असुन मेहकर तालुका क्रीडा संयोजकासह टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र चे ते जिल्हा सचिव असुन अमरावती विभाग प्रमुख आहेत.सफक टकरा असोशियनचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष आहेत.खेलो मास्टर्स गेम असोसिएशन चे जिल्हा सचिव असुन कबड्डी खेळासाठी महाराष्ट्रचे पदाधिकारी आहेत.
शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य कोअर कमिटी सदस्य असुन विविध जबाबदारी पार पाडत आहेत. या विजयामुळे परीसरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.
संस्थेचे अध्यक्ष ॲड.दत्ताजी भुतेकर,सचिवा सौ.रेखाताई भुतेकर, मुख्याध्यापक सुरेश मुठ्ठे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानकर, लक्ष्मीकांत यादव,धारपवार, मिलिंद काटोलकर तालुका क्रीडा अधिकारी व प्रमोद रायमुलकर सर यांनी अभिनंदन करुन राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.