spot_img

रुग्णांची सेवा करण्याची संधी म्हणजे ईश्वरसेवाच… मुख्यमंत्री वैद्यकीय क्षेत्राला एकनाथराव शिंदे यांनी दिली नवसंजीवनी -मंगेशजी चिवटे रविकांत तुपकराचे नुसतं स्टंटबाजी- आमदार संजय रायमुलकर

मेहकर (अनिल मंजुळकर . रोखठोक न्यूज वृत्त सेवा )

लोकनेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून वैद्यकीय क्षेत्राला सेवामय बनवत अनेक सुविधा पुरविल्या जात असून, भविष्यात वेगवेगळ्या शस्त्रक्रिया आणि अनेक अवयव प्रत्यारोपन करणे आपल्याला शक्य व्हावे हा आमचा मानस असून, गरीब आणि सर्व लोकांना ह्या सुविधा मोफत पुरविल्या जाव्या ह्या साठी आग्रही असल्याचे प्रामाणिक मत असल्याचे मत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी व्यक्त केले.

ते भूमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव, युवासेना नेते नीरज रायमूलकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित अंबिका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व ऋषीकृपा मेडिकल स्टोअर्स उद्घाटन व भव्य मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. संजय रायमूलकर उदघाटक डॉ. अनिलकुमार गाभने,
तर प्रमुख अतिथी म्हणून दादासाहेब थेटे, ओ. एस. डी. मुख्यमंत्री सचिवालय,माधवराव जाधव सभापती, कृ. ऊ. बा. स. मेहकर, सुरेशतात्या वाळूकर ता. शिवसेना प्रमुख, ऋषीभाऊ जाधव जिल्हा युवासेना प्रमुख,
नीरज रायमूलकर, शिवपाटील तेजनकर, डॉ. उमेश जाधव, मा. पास्टे सर समाजसेवक, डॉ. पुरषोत्तम वायाळ, सरपंच रुपालीताई वडणकर,डॉ. केशव अवचार, मा. पं. स सदस्य गजानन वडणकर,जीवन पाटील धोटे, पंडित पाटील धोटे उपस्थित होते.

सुरुवातीला मंचावरील सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक
श्रीकांत शिंदे फाउंडेशन चे पश्चिम विदर्भ समन्वयक अमर राऊत यांनी केले.
त्यानंतर युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषीभाऊ जाधव यांनी धोटे परिवाराने स्थापन केलेल्या अंबिका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या भविश्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ह्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले दादासाहेब थेटे ओ. एस. डी.मुख्यमंत्री सचिवालय यांनी मुख्यमंत्री कक्षाच्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची जनतेला माहिती दिली.

त्यानंतर आपल्या अभ्यासपूर्ण भाषणामध्ये मंगेश चिवटे यांनी लोकनेते एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून कोणकोणत्या वैद्यकीय योजना राबवल्या जात आहेत त्याची सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून मदत मिळवायचे असल्यास कशा पद्धतीने अर्ज भरावा याची सुद्धा माहिती दिली. भविष्यात वेगवेगळ्या अवयवांचे प्रत्यारोपण करण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करत असल्याचं ते बोलले.त्यानंतर नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेले मा संजय उतपुरे हिवरा खुर्द, सुभाष खुरद कळमेश्वर, गजानन गवई मा. पेठ, राजू पाखरे घाटबोरी यांचा सत्कार करण्यात आला.


आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये
माननीय आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. एकनाथराव शिंदे यांच्यासोबत गेल्यापासून करोडो रुपयाचा निधी कसा आणला याचा पाढाच त्यांनी वाचला. टीका करायची म्हणून विरोधक टीका करतात मात्र विकास कामांवर ते अजिबात बोलत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

लोक आम्हाला गद्दार म्हणतात पण आम्ही आमचा जो पारंपारिक मित्र आहे त्याच्या सोबत युती केली त्यामुळे गद्दार कोण आहे हे जनतेनेच ठरवावे. आम्ही जनतेशी बांधील आहोत इतर कोणाशीही नाही. अश्या भावनिक भावना आमदार संजय रायमुलकर यांनी व्यक्त केल्या. पुढे बोलतांनी रविकांत तुपकरावर हल्ला करत सोयाबीन व कापूसाचे भाव वाढ राज्य सरकारच्या हातात आहे का,? नुसतं देखावा करत शेतकऱ्यांची थट्टा करत असल्याचा आरोप सुध्दा केला.

पेनटाकळी प्रकल्पाच्या बाधित शेतकऱ्यांना पाणी मिळवून देऊ. या तुपकराचया हातात नाही ते मी करुन दाखवतोय. दहा ते पंधरा दिवसांत पेनटाकळी कालव्याचे काम सुरू होणार असल्याचे सुध्दा सांगितले.
गारपीटग्रस्त भागाची पाहणी आटोपून खासदार उशिरा कार्यक्रमस्थळी दाखल झाले.

त्यामुळे फटाक्यांची अतिशय बाजी करत युवसेना आणि शिवसेना पदाधिकारी यांनी केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर परिसरातून आलेल्या उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी शाल आणि श्रीफळ देऊन खासदार यांचा सत्कार केला.
4तास चाललेल्या या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते डॉ. कृष्णा हावरे यांनी तर आभार प्रदर्शन युवा उद्योजक मोहन पाटील धोटे यांनी केले.

वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन & अंबिका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य मोफत आरोग्य शिबिरात 435रुग्णांनी लाभ घेतला असून डॉ. विवेक सावके जिल्हा समन्वयक यांच्या मार्गदर्शनात मा. ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत नोंदणीकृत दवाखान्यातील चमुने सेवा दिली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहन धोटे पाटील, अमर राऊत, किशोर पाटील गव्हाड, कृष्णा हावरे, डॉ. माडोकार, डॉ. चनखोरे,रुपेश पंडितराव धोटे अंबिका महिला अर्बन चे सर्व कर्मचारी, अंबिका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या