spot_img

मेहकर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात अवकाळी पावसाने झोडपले, सोलर पॅनलचे नुकसान !

 

मेहकर (अनिल मंजुळकर रोखठोक न्यूज वृत्त सेवा)

मेहकर तालुक्यातील बेलगाव मध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने तुरीचे उभे पिक जमीन दोस्त झाले असुन सोलर पंपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हवामान खात्याने वर्तविला नुसार अंदाज प्रमाणे रात्रीपासून मेहकर तालुक्यातील सार्वत्रिक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला रात्रीपासून मुसळधार पावसामुळे शेतीचे शेतातील पिके आणि सोलर पंप मुळापासून उखळले त्यामुळे सर्व

सोलरच्या पाट्या फुटल्या आणि जास्त हवा आणि पाऊस असल्याने गावातील विद्युत पुरवठा बंद पडला अनेक झाडे कोसळले त्यामुळे शेतकरी सकाळी पाऊस ओसडल्यावर शेतकरी शेतात गेला असता शेतकरी यांच्या शेतातील उभी तुरीला शेंगाणे व फुलाने बहरलेली होती पण या अवकाळी पावसामुळे उभे पिकाचे झाडे कोसळले त्यामुळे शेतकरी यांचे अतोनात नुकसान झाले त्या करिता शासनाने पंचनामे करून व पाहणी करुन तात्काळ शेतकरी यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे यावेळी नंदकिशोर वानखेडे सुजीत वानखेडे सुधीर वानखेडे व अनेक शेतकरी यांच्या सोलरच्या पाट्या फुटल्या व पंप उडुन बाजुला पडल्याने नुकसान झाले .

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या