लोणार (सचिन गोलेछा. रोखठोक न्यूज वृत्त सेवा):
लोणार येथील कै. कु. दुर्गा क बनमेरू विज्ञान महाविद्यालय लोणार, जिल्हा बुलढाणा या महाविद्यालयास नॅक मूल्यांकन द्वितीय चक्र प्रक्रियेमध्ये 2.88 सी जी पी ए तथा B++ ग्रेड मिळविला आहे. पश्चिम विदर्भातील ग्रामीण भागातील लोणार तालुक्यातील एकमेव विज्ञान शाखेचे B++ ग्रेड मिळवणारे बनमेरू विज्ञान महाविद्यालयाने एक मानाचा तुरा रोविला आहे.
या नॅक मूल्यांकन प्रक्रिये दरम्यान नॅक (NAAC) बेंगलुरु यांचे तर्फे तीन सदस्य समिती मध्ये प्रा. एम. भास्कर, प्र-कुलगुरू, श्री व्यंकटेश्वर युनिव्हर्सिटी तिरुपती, प्रा. एन राजलिंगम, सुंदरनार युनिव्हर्सिटी, तमिळनाडू व प्राचार्य अब्दुलरहमानी ओलापिलन, मॅमपॅड कॉलेज, मलापुरम, केरळ या मूल्यांकन समितीने महाविद्यालयास दिनांक 17 व 18 नोव्हेंबर 2023 रोजी भेट देऊन विविध शैक्षणिक व भौतिक सुविधांची तपासणी करून मूल्यांकन प्रक्रिया पार पाडली.
या मूल्यांकन प्रक्रियेमध्ये महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. प्रकाश क. बनमेरू यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. तसेच अमृत सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सौ. उषा गोले व सचिव सन्माननीय डाॅ. संतोष बनमेरू व सर्व सन्माननीय व्यवस्थापन पदाधिकारी यांनी पाठबळ देऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेऊन मूल्यांकन प्रक्रियेस सामोरे गेले. या मूल्यांकन प्रक्रियेमध्ये महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, तसेच पालक वर्ग व इतर सर्व संबंधित घटकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
एकूणच पश्चिम विदर्भात महाविद्यालयाच्या प्रगतीचा ठसा या घवघवीत यशाने परिसरात उमटला आहे. या प्रक्रियेमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश क. बनमेरू, नॅक समन्वयक प्रा. शारीक शेख, आयक्यूएसी समन्वयक डॉ. महेंद्र भिसे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनी या सर्वांचे मोलाचे योगदान लाभले.