मेहकर – (अनिल मंजुळकर रोखठोक न्यूज वृत्त सेवा)
महिला बचतगटांच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची खरेदी सर्वांनी करावी व महिला सबलीकरण करण्यासाठी सहकार्य करावे.बचतगटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण शक्य असून त्यासाठी बचतगटांना सर्व ती आवश्यक मदत केली जाईल ,असे विचार खासदार प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले.
नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास , महिला आर्थिक विकास महामंडळ , नाबार्ड , राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त प्रयत्नातून मेहकर येथे खासदार जाधवांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय बचतगटांच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची प्रदर्शनी आणि विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.मे ए सो विद्यालयाच्या प्रांगणात ही भव्य प्रदर्शनी सुरू करण्यात आली असून उदघाटन प्रसंगी खासदार जाधव यांनी वरील विचार व्यक्त केले.
आमदार संजय रायमूलकर यांच्यासह शिवसेनेच्या महिला आघाडी शहर अध्यक्ष वैशाली सावजी, कविता दांदडे, दिपीकाताई रहाटे , शरडज देशमुख, नंदाताई तुरूकमाने खासदार जाधव यांच्या पत्नी राजश्रीताई जाधव , जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सुनील पाटील , महिला विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक सुमेध तायडे , नाबार्ड चे रोहित गाडे , उमेदचे विक्रांत जाधव , आदी प्रामुख्याने उपस्थित होते .
प्रदर्शनीचे खासदार जाधव यांचे हस्ते उदघाटन झाले .मोठ्या संख्येने महिला बचतगटांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. जिल्ह्यातील पाच तालुका स्तरावर बचतगटांच्या वस्तू विक्रीसाठी कायमस्वरूपी दुकान संकुल उभारण्यात आले असून आज मेहकर येथील संकुलाचे उदघाटन खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले.
महिला बचतगटांच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू दर्जेदार असतात त्यांच्याकडूनच सर्वांनी खरेदी करावी . बचत गटांना सर्वतोपरी मदत केली जाईल असे सांगून आमदार संजय रायमुलकर यांनी खासदार जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन शिवसेनेचे शहर प्रमुख जयचंद भाठिया यांनी केले.