spot_img

भिषण अपघात ! तिहेरी अपघातात एक ठार तर सहाजण जखमी, सर्व जखमी मेहकर तालुक्यातील

 

मेहकर (अनिल मंजुळकर ) मेहकर तालुक्यातील मेहकर ते चिखली रोडवर असणाऱ्या बाभुळखेड फाट्यावर तिहेरी अपघातात एक ठार तर सहाजण जखमी झाल्याची घटना भर दुपारी दोन वाजेदरम्यान घडली .

मिळालेल्या माहितीनुसार राम विष्णू मापारी राहणार लोणार हा चिखली येथून आपल्या मित्राला सोडून घरी परत येत असताना समोरून येणाऱ्या मोटारसायकल व कार या तिहेरी अपघात घडला. दोन्ही कार एकमेकांवर आदळून लोणार येथील चालकाचा राम विष्णु मापारी वय २५ जागीच मृत्यू झाला.

व दुसऱ्या कारमधील मोबाईल टावरचे काम करणारे चंदु भाणुसे, मोहसीन शेख, एजाज शेख, संभाजी खंडारे हे सर्व जखमी झाले असुन यांना खासगी दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अहिर यांनी घटनास्थळी भेट देत जखमींना रुग्णालयात पाठविले.

अपघात वेळी वाहनांच्या भरपूर रांगा लागल्या होत्या. मोटार सायकल वरील जखमीची नांवे समजली नाहीत. मेहकर पोलिस स्टेशन मध्ये कार्यवाही सुरू होती.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या