मेहकर (अनिल मंजुळकर रोखठोक न्यूज वृत्त सेवा)
मेहकर येथील मोळा रोडवर स्थित एका घरावर 31 लोकांच्या टोळक्याने 12 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 7:30 दरम्यान शुल्लक कारणाने घरावर हल्ला केला असुन घरा शेजारील युवका सह फिर्यादीचा मुलगा जखमी झाला व टोळक्याने घरातील साहित्य नासधूस करत महिलेच्या गळ्यातील 1 तोळ्याचे मंगळसूत्र लुटल्याची फिर्याद 13 नोव्हेंबर रोजी सौं नेहाताई शेषराव काटकर यांनी मेहकर पोलीस स्टेशनला दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मोळा रोडवर राहणाऱ्या सौं नेहाताई शेषराव काटकर वय 43 वर्षे हया गल्लीतील महिलांच्या सोबत 12 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 7:30 वाजता दरम्यान गल्लीतील मंदिरावर पूजेसाठी जात असतांना आरोपीनी गैर कायदा मंडळी जमा करून हातात लाठ्या काठ्या घेऊन धुडगूस घालत होते.
अश्यात एका 15 वर्षीय मुलीच्या समोर फटाके फोडून अश्लील हावभाव करत तीची छेडछाड केली व अश्लील भाषेत शिवीगाळ केली सौं नेहाताई च्या अंगावर असलेले 1 तोळ्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून घेतले तेव्हा त्यांनी मदतीसाठी आरडाओराड केली असता त्या ठिकाणी सौं नेहाताई यांचा मुलगा प्रतीक काटकर व शेजारी राहणारा वैभव आवारे हे पळत आले असता टोळक्याने लाठी काठीने मारहाण केली ज्यात प्रतीक गंभीर जखमी झाला टोळक्याने घरात घुसून खिडक्याची काचा फोडल्या व सामानाची नासधूस केली.
या प्रकरणी सौं नेहाताई शेषराव काटकर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून मेहकर पोलिसांनी कलम 143, 147, 148, 149, 395,354.354,ड 452,324,323, 336,294,427, भादवी सह कलम 8, 12 पोस्को नुसार
.आरोपी अमीर शाह. . सलमान शाह 3 आसीफ शेख, जावेद शेख, जुनेद मौलाना पठाण अलताफ पठान, जावेद पठान,सुलतान शाह, सोनु शाह,नालु शाह . फिरोज व इतर 20 लोकांचा जमाव सर्व रा.पैनगंगा नगर रोड मेहकर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला.
शिवरायांची शपथ मी त्यांना सोडणार नाही – आमदार संजय गायकवाड
काटकर परिवार शिक्षकी पेशात आहे. त्यांचा राजकारणाशी संबंध नाही संपूर्ण समाजाला मी द्वेष देत नाही. पण् ज्या मुस्लिम गावगुंडांनी हा भ्याड हल्ला केला मुलीचा विनयभंग केला काहींना जखमी केले दिवाळीचा दिवस असल्याने वातावरण खराब होऊ नये म्हणून मी गप्प बसलो त्या माजलेल्या मुस्लिम आरोपींची जमानात होईल. त्यानंतर मी त्यांना सोडणार नाही हे शिवरायांची शपथ घेऊन सांगतो असे आमदार संजय गायकवाड यांनी मेहकर येथे पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी ठाणेदार शिंगटे उपस्थित होते.
गुप्त वार्ता विभागाचे निष्क्रियता अन् ठाणेदार शिंगटे
मेहकर शहर अतिसंवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. मेहकर शहरात जातीय दंगलीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलिस विभागाकडून गुप्त वार्ता अधिकारी व कर्मचारी यांची निवड करण्यात येते. पण् काल झालेल्या प्रकरणामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था प्रश्न ऐरणीवर आला आहे. याचे पडसाद मंत्रालयात सुध्दा पडले असल्याची माहिती हाती आली आहे. गुप्त वार्ता विभागाच्या हलगर्जीपणामुळेच मेहकर चे ठाणेदार शिंगटे यांची उचलबांगडी होणार असल्याचे बोलल्या जात आहे.