मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)
मेहकर तालुक्यातील घटना :
दिवसभर महावितरण ची कामे करुन घरी रात्री नऊ वाजे दरम्यान मोटारसायकलने घरी परतीच्या प्रवासात रानडुकराने जोरात धडक देऊन जखमी केल्याची घटना घडली. धडकेत राणडुकर ठार तर कर्मचाऱ्याला संभाजी नगर येथे हलविण्यात आले आहे.
जानेफळ ते वाडीच्या मधोमध चांगाडे सरांच्या घरांजवळ महावितरण कंपनीचा कर्मचारी संदिप दहातोंडे हा नायगाव येथे आपल्या घरी मोटारसायकलने जात होता. वाटेतच राणडुकर ने मोटारसायकला धडक दिली. संदिप दहातोंडे रस्त्यावर पडल्याने डोक्याला मार लागला आहे. जखमी ला मेहकर व संभाजी नगर ला दवाखान्यात हलविण्यात आले आहे.