spot_img

मेहकर तालुक्यात रविकांतभाऊ तुपकर यांच्या ‘एल्गार रथयात्रे’ला मिळतोय अभूतपूर्व प्रतिसाद

मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)

मेहकर तालुक्यात काल तिसऱ्या दिवशी ‘एल्गार यात्रा’ दाखल होताच तालुक्यातील नायगाव देशमुख, देऊळगाव साकरशा, वरवंड, जानेफळ, घुटी, पार्डी, हिवरा खुर्द, मारोती पेठ, मोळा-मोळी, लोणी गवळी, विश्वी या गावांत प्रचंड मोठ्या उत्साहात रविकांत तुपकर यांच्यावर फुलांची उधळण करत गावकऱ्यांनी स्वागत केले.

दरम्यान, लोणी गवळी, विश्वी या ठिकाणी मोठ्या सभा पार पडल्या. सर्व गावांमध्ये रविकांत तुपकर यांनी गावकऱ्यांशी उत्स्फूर्त संवाद साधला, मेहकर तालुक्यात ‘एल्गार रथयात्रे’ला मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. शेतकरी-शेतमजूर बांधवांच्या मनात आपल्या हक्कासाठी निर्माण झालेली आग निश्चित सरकारला हलविणारी असेल, असा विश्वास रविकांतभाऊंनी व्यक्त केला.

या दौऱ्यामध्ये लक्ष्मणदादा घुमरे, देवानंद पवार, भास्करराव ठाकरे, सागर पाटील, पांडुरंग पाटील, प्रा.भैय्यासाहेब पाटील, जितूभाऊ अडेलकर, गोपाल सुरडकर, दिलीपजी बोरे,भूषण काळे, अनिल बोरकर, वैभव आखाडे,देवेंद्र आखाडे, कैलास उत्तपुरे हिवरा खुर्द, शिवाजी ढवळे हिवरा खुर्द, महेश काळे मारोतीपेठ , गजानन देशमुख, पांडुरंग पाटील,कृष्णा चव्हाण देउळगाव साकरशा, बी. एम, राठोड, सखाराम आमले, विजय आंधळे, रामेश्वर वायाळ, गजानन होनमणे,अक्षयजी निकस, गणेश तिवारी, ज्ञानेश्वर दांदडे, बाळूभाऊ देवकर, गणेशजी कष्टे, आकाश मोसंबे (मोसंबे वाडी) यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

‘एल्गार रथयात्रे’च्या तिसऱ्या दिवशीच्या यशस्वी नियोजनासाठी डॉ.ज्ञानेश्वर टाले व सहकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या