मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)
धार्मिक मदरशात मुलांना धार्मिक शिक्षण देणाऱ्या एका मौलानाने आत्याच्या घरी पाहुणे म्हणून गेलेल्या25 वर्षीय विवाहित महिलेला उपचार करण्याच्या नावावर एका खोलीत नेऊन अश्लील प्रकारचे व्हिडिओ तयार करून धमकी देत महिला सोबत जबरदस्तीने अनैतिक संबंध स्थापित करून शारीरिक संबंध ठेवणाऱ्या 23 वर्षीय मौलानाविरुद्ध मेहकर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे
2018 मध्ये येथील फिर्यादीचे एका मुलासोबत मुंबई येथे रिती रिवाज प्रमाणे लग्न झाले होते लग्न झाल्यानंतर आईकडे आल्यानंतर ती आपल्या रिसोड तालुक्यातील चिचांबा भर येथे राहत असलेल्या आत्याच्या घरी पाहुणे म्हणून गेली होती.
त्या ठिकाणी आत्याच्या घरी येत असलेल्या मौलाना उबेद उर्फ नजीर कुरेशी यांनी सदर महिलेशी ओळख करून तुझा उपचार करून देतो या नावावर एका खोलीत नेऊन अश्लील प्रकारचे व्हिडिओ तयार केले व धमकी देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले .
काही दिवसानंतर तू तुझ्या पतीसोबत तलाक घे मी तुझ्यासोबत लग्न करतो असे आमिष देऊन वेळोवेळी काढलेले व्हिडिओ व्हायरल करण्याचे नावावर माझे लैंगिक शोषण केले नंतर मी मेहकर ला आपल्या आईकडे आले असता त्यांनी मेहकर ला येऊन 13 नोव्हेंबर 2022 रोजी जानेफळ रस्त्यावरील घरकुल मध्ये बोलून जबरदस्ती संबंध केले त्यावेळी घरकुलातील लोकांनी आम्ही दोघांना रंगें हात पकडले होते .
माझी पूर्णपणे बदनामी झाल्यामुळे माझ्या पतीनेही मला तलाक दिले नंतर मी लग्न करण्यासंदर्भात सांगितले असता त्यांनी आपला फोन बंद केला माझ्या वडिलसुद्धा या संदर्भात त्यांच्या वडील व नातेवाईकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही जबाबदारी घेतली नाही
दिनांक 3 नोव्हेंबर 2023 ला उबेद उर्फ नजीर च्या गावी चिंचांबा भर त्यांच्या घरी गेलो असता परिवारातील लोकांनी मला घरी घेण्यास नाकार दिला असल्याचे तक्रारीत फिर्यादी महिलांनी म्हटले आह पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मेहकर पोलिसांनी आरोपी मौलाना उबेद उर्फ नजीर शबाब कुरेशी यांच्या विरुद्ध भादवि 376.376, (2)(एन)506. प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.