मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)
मेहकर तालुक्यातील 7 ग्रामपंचायच्या निवडणुकी दरम्यान प्रस्थापित व सोबतच नव्याने भाग्य उमेदवारांची लढत पाहायला मिळाली .
अश्यात जनते मधून सरपंचांची निवड झाल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली ज्यात प्रस्थापिताना जनतेने नाकारून गावांचा विकास हवा असल्याने जनतेनेच धक्कादायक निर्णय दिला.
आज रोजी लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये जानेफळ येथून सौ.रुपाली गजानन वडणकर,कळबेश्वर येथून सौं विद्या सुभाष खुराद,मारोतीपेठ येथून सौं शिलाबाई गजानन गवई, बेलगाव येथून सौं विमलताई अर्जुनराव वानखेडे, बाऱ्हई येथून सौं उषा नितीन पवार, घाटबोरी येथून राजकुमार महादेवराव पाखरे,चायगाव येथून सौं पुष्पाताई प्रभाकर देशमुख हे सात उमेदवारांना जनतेने सरपंचपदी स्वीकारले.
विशेष म्हणजे जास्तीत जास्त सरपंच पदाचे उमेदवार हे प्रस्थापित होते ज्यांनी मागिल काही पंचवार्षिक मध्ये स्वतः किंवा आपल्या पॅनल मधील लोकांना सत्तेत आणून गावकारभारी व गावपूढारीपण गाजवले होते.
मात्र जनतेने त्यांना स्पष्टपणे नकार दिला आहे. माजी सरपंचाला विकासाची भाषा करणाऱ्याला चपराक दिली. मागील निवडणुकी मध्ये घाटबोरी चे राजकुमार पाखरे यांचा पराभव झाला होता.
पण यावेळी जनतेने पाखरे यांना सरपंच पद बहाल केले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये मेहकर तालुक्यातील 7 ग्रामपंचायत मधून 81 ग्रामपंचायत सदस्य निवडले जाणार होते. त्या पैकी 17 उमेदवार हे निर्विरोध निवडून आल्याने 64 उमेदवारांच्या साठी मतदानात झाले होते मतदानाचा टक्का वाढल्याने जनते मध्ये लोकशाहीच्या उत्सवा प्रती उत्साह पाहायला मिळाला. या निवडणुकी मध्ये 81 टक्के मतदारांनी मतदानाचे हक्क बाजावून गावकारभारी निवडून दिले.