spot_img

जानेफळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ. रुपाली गजानन वडणकर विजयी जानेफळ

 (अनिल मंजुळकर.रोखठोक न्यूज वृत्त सेवा)

जानेफळ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपदी सौ. रुपाली गजानन वडणकर यांची वर्णी लागली आहे. ४९४ मतांनी विजयी प्राप्त झाला असुन जानेफळ ग्रामपंचायतीवर आपलं पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
जानेफळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला गजानन वडणकर आणि डॉ. सतिश कुळकर्णी या दोघांनी पॅनल उभे केले होते. तिसरा अपक्ष महादेव पाखरे होते.

निवडणुकीत सरपंच पदासाठी रस्सीखेच जोरात सुरू होते. गावातील जनतेने गजानन वडणकर यांच्या नावाला पसंती देऊन सरपंचपदी सौ. रुपाली गजानन वडणकर यांना विराजमान केले. वार्ड २ मध्ये दिग्गज नेते डॉ.

सतिश कुळकर्णी यांचा पराभव करून विजय कृपाळ यांनी दणदणीत विजय प्राप्त केला. सदस्यपदी विजय कृपाळ, देवेंद्र आदमणे, स्नेहा वडणकर, वैशाली केदारे, शंकर चांगाडे, दिपक राऊत, रंजना सुरजसे, शोभा काळे , तांबोळी, चंद्रभागा दांडगे, व जनशक्ती पॅनलचे निवडुण आलेले सदस्य शुभदा सतिश कुळकर्णी, मनोज गोतरकर, सचिन राजुरकर, वंदना मुरडकर, भारत घायवट, कावेरी जाधव , व सुनिता कंकाळ हे आहेत.

सौ. ज्योती राजु केदारे यांचा निवडणुकीत पराभव करून सौ. रुपाली गजानन वडणकर पदी विराजमान झाले आहे. जानेफळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपद बहाल केल्यामुळे गावातील सर्व जनतेचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या काम करणाऱ्या व मित्रमंडळींचे गजानन वडणकर यांनी आभार व्यक्त केले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या