spot_img

जानेफळात डॉ. कुळकर्णीच दुष्काळात पाणी पाजु शकतात , त्यामुळे यंदा जानेफळात निवडणुकीत शिट्टीच! जनशक्ती पॅनलची प्रचारात आघाडीच असल्याची जनमानसात चर्चा 

 

जानेफळ (अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)

जानेफळ येथे ग्रामपंचायत निवडणूकीसाठी जोरदार तयारी झाली आहे. निवडणुकीत सरपंच पदासाठी तिन उमेदवार ठाकले आहेत. पण् जनशक्ती पॅनलचे प्रमुख असलेल्या डॉ. कुळकर्णी हेच संपुर्ण गावाला पाणी पाजु शकतात यावर आता जणमाणसात शिक्कामोर्तब झाले असल्याची गावभर चर्चा सुरू असल्याने विरोधकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

जानेफळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी रुपाली गजानन वडणकर, ज्योती राजु केदारे, व अपक्ष साधना महादेव पाखरे आहेत. डॉ. जनशक्ती पॅनलचे प्रमुख डॉ. कुळकर्णी व आदर्श पॅनलचे प्रमुख गजानन वडणकर, व नवयुवकांचे अपक्ष उमेदवार महादेव पाखरे आपल्या सरपंच पद खेचुन आणण्यासाठी धडपडत आहेत.

गाव विकासाच्या नावाखाली अनेक जण गुप्त बैठकीत भुलथापां देत आहे. गेल्या दोन पंचवार्षिक मध्ये डॉ. सतिश कुळकर्णी यांनी गावात सत्ता हाती असतांना जानेफळातील जनतेला पाणीच पाजले .

पेनटाकळी धरणावर स्वतः च्या पैशाने दोन कामगारांना ठेवुन गावात पाणी पाजले. हिवरा आश्रम येथुन महावितरण कंपनीला लाईन संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करून लाईन ची व्यवस्था चोवीस तास केली आहे. लाईन मुळें मोटारी बिघडत असल्याकारणाने शिल्लक मोटार विकत घेऊन जानेफळातील जनतेला पोटभर पाणीच पाजले.

त्यामुळे त्यांची पाणीदार म्हणून ओळख निर्माण झाली आहे. गावातील लोडशेडींग बंद केले. गावातील सामाजिक कार्यात सदैव तत्पर असतात. हे सुद्धा सत्य नाकारता येणार नसल्याचे गावातील जणता उघडपणे बोलत आहे. विरोधकांच्या विकासात्मक कामे कोणती ?

विरोधकांची कारनामे सर्व गावातील जनतेला माहिती असल्याचे गुप्त प्रचारात बोलत आहे. त्यामुळे जनशक्ती पॅनलचे डॉ. सतिश कुळकर्णी यावर्षी दुष्काळात गावाला पाणी पाजु शकतात. असे बेधडक बोलत असल्याने शिट्टीचा आवाज अधिकच जनतेच्या मनात घुमत असल्याचे बोलल्या जात आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या