अवैध धंदे करणाऱ्या भावी सरपंचपतीला पदाचे लागले वेध ,जानेफळ गावाचा विकास होईल का ?
मतदार राजात जोरदार चर्चा !
जानेफळ (अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा) जानेफळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तिघांनी प्रचारात आघाडी घेतली असून अवैध धंदे करणाऱ्याला सरपंच पदांवर बसवणार का ? उद्या बाजारात खुलेआम वरली मटका ची दुकाने थाटली जातील म्हणून थंडीच्या दिवसात शेकोटी दरम्यान गप्पा रंगल्या चे दिसत आहे .
मेहकर तालुक्यातील सर्व जनतेला जानेफळात निवडणुकीच्या वेध लागले आहेत. जानेफळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे वेध भविष्यातील निवडणुकीच्या वेळेस जास्त महत्वाचे आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती , खासदार, आमदार की साठी जानेफळातुन मतदान जास्त होत असल्याने सगळ्या राजकीय पक्षांचे जानफळातील ग्रामपंचायतीवर जास्त विशेष लक्ष देत आहे . गावातील पाणी रस्ते नाल्या. विज यांच्या सोबत अनेक जनतेच्या प्रश्नावर उत्तर देताना उमेदवारांची दमछाक होत आहे. जानेफळात बाजारात खुलेआम वरली मटका जोमात सुरू आहे. बाजारात येणाऱ्या महिलांना त्रास होतो. वरली मटकी चा कोण किंग आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे जानेफळातील भावी सरपंच पदाच्या निवडणुकीत उमेदवारांच्या पतीची चांगलीच दमछाक होणार आहे. उमेदवार आपापल्या परीने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वजा बाकी करतांना आज रोजी दिसत आहे. भाऊ तुम्हीच सरपंच म्हणून मोठेपणा देत बाहेरचा रस्ता दाखवत आहे. त्यामुळे उमेदवारांची गोची होतांना दिसत आहे. गावाला सरपंच कसा पाहिजे यावर सुज्ञ मतदार राजा विचार करून निर्णय देणार आहे. तुर्तास एवढेच…