spot_img

यंदा होणार जानेफळात तेली समाजाचा सरपंच , कारण हि तसेच… वाचा सविस्तर बातमीत!

यंदा होणार जानेफळात तेली समाजाचा सरपंच , कारण हि तसेच… वाचा सविस्तर बातमीत!
जानेफळ (अनिल मंजुळकर) मेहकर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी ग्रामपंचायत म्हणजे जानेफळ यंदा जानेफळात निवडणुकीत चांगलाच चुरस पाहायला मिळत आहे. गाव पुढारी सरसावले असून यंदा जानेफळात तेली समाजाचा सरपंच होणार आहे. कारण तिन हि उमेदवार एकाच समाजातील असल्यामुळे सरपंच पद त्यांच्याकडेच असणार आहे.
जानेफळात सकाळपासून प्रचाराला सुरुवात होते. भावी सरपंच व सोबतीला असणारे भावी उमेदवार घर टु घर घेत आहेत. सर्व जनतेच्या प्रश्नावर उत्तर देत आम्हाला मतदान करा भाऊ म्हणून हात जोडत आहे. या निवडणुकीत प्रचारात लहान मुलांना सोबत घेऊन जोरजोराने नारे देत आहे. सकाळ व संध्याकाळ वार्डात जाऊन बैठका पार पाडत आहे.तेली समाजातील सरपंच पदासाठी ज्योती राजु केदारे, रुपाली गजानन वडणकर, व अपक्ष उमेदवार साधना महादेव पाखरे हे तिन उमेदवार आहेत. मुस्लिम समाजातील सदस्य पदासाठी साठी अपक्ष उमेदवार सैय्यद जाबीर महेबुब व सैय्यद साहिस्ता जाबीर आहेत. गेल्या पंचवार्षिक ग्रामपंचायतीमध्ये डॉ. सतिश कुळकर्णी यांच्या सोबत असणारे जेष्ठ पत्रकार सैय्यद महेबुब भाई यांना ऐनवेळी कुळकर्णी यांनी तिकीट नाकारले.व दुसरा उमेदवार दिला आहे. त्यामुळे नाराज झालेल्या सैय्यद महेबुब भाई यांनी आपल्या मुलाचा सैयद जाबीर महेबुब व सुनेचा सैय्यद साहिस्ता जाबीर यांचा अपक्ष अर्ज दाखल केला आहे. मुस्लिम समाज हा नेहमी डॉ. कुळकर्णी यांच्या सोबत राहत आलेला आहे. स्वतःच्या समाजातील एक मत सुद्धा या वार्डात नसताना त्यांच्या पत्नीला या समाजाने मागील पंचवार्षिक मध्ये मोठ्या मताधिक्याने विजयी केले होते परंतु यावेळी मुस्लिम समाजाला विश्वासात न घेता आपल्या मर्जीने मुस्लिम उमेदवार लादल्याने त्यांचा फटका यावर्षी त्यांना बसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुस्लिम समाजातही फुट पडलेली दिसत आहे. डॉ. कुळकर्णी यांनी बर्याच जणांना सदस्य पदासाठी आशेवर ठेवुन ऐनवेळी तिकीट नाकारले असल्याचे बोलल्या जात आहे.
बारव मध्ये गणपती विसर्जन रोखले ….
वार्ड क्रंमाक एक मध्ये पिढ्यांत पिढ्या गणपती बाप्पा विराजमान होत असतात. वार्डातील नागरिक पुजा अर्चना करत असतात. भक्तीमय वातावरणात बाप्पाला निरोप देण्यासाठी जमलेले असतात.स्वामी चे मंदिर असलेले ठिकाणावर पुरातन काळापासून बारव मध्ये गणपती विसर्जन केल्या जाते . हि परंपरा आहे पण् यावर्षी पहिल्यांदा डॉ. कुळकर्णी यांनी गणपती विसर्जन रोखल्या मुळे भाविक भक्त कमालीचे नाराज झाले आहेत.याच वार्डात शुभदा सतिश कुळकर्णी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे यावेळेस उमेदवारी धोक्याची असल्याचे बोलल्या जात आहे.
जानेफळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यंदा सरपंच हा तेली समाजाचाच होणार…. एवढं नक्की…

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या