जानेफळ (अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)
मेहकर तालुक्यातील जानेफळ ग्रामपंचायतदोन नंबरची समजली जाते. बाजार पेठ सर्वात मोठी आहे. जास्त निधी उपलब्ध असतो. प्रत्येक गल्लीत समस्या कायम असल्यामुळे जानेफळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभ्या असणाऱ्या उमेदवारांना तोंड द्यावे लागत आहे.
जानेफळ चे राजकारण खेळण्यासाठी सर्व माहिर असणारे डॉ. सतिश कुळकर्णी , डॉ. धनराज राठी, सुरेश अण्णा वडणकर, गजानन तात्या कृपाळ,खंडुभाऊ सवडतकर ,गणेश पाखरे, संतोष तोंडे, महेबुबभाई, व इतर अनेक दिग्गज नेते राजकीय शिमगा खेळण्यासाठी सज्ज झाले आहे. सरपंच पदासाठी ज्योती राजु केदारे , रुपाली गजानन वडणकर , अपक्ष साधना बाळु भाऊ पाखरे उभे ठाकले आहे. उभे असणारे सरपंच घरोघरी जात आहे. गावातील समस्या ऐकून घेत आहे. त्या पुर्ण करु अशा आकाभाका देत आहे. गणितांची जुळवाजुळव सुरू आहे.सरपंच पदासाठी रुपाली गजानन वडणकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
पाणी पाणी करणारे नेत्यांची गोची !
गेल्या पंचवार्षिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत डॉ. कुळकर्णी व राठी यांचे दोन वेगवेगळे पॅनल होते. डॉ. कुळकर्णी यांनी गजानन उंबरकर व डॉ. राठी यांनी छगन मामा हिवराळे यांना निवडणूकीत उभे केले होते. कुळकर्णी यांनी गजानन उंबरकर यांचा खर्च करून गावात बळीचा बकरा बनवला होता .व स्वतः निवडणुकीत निवडून आले होते.
हा विषय आज रोजी चर्चिला जात आहे. डॉ. राठी यांनी छगन मामा हिवराळे यांना सरपंच पद बहाल केले होते. कोणतीच कामे झाली नसल्याने जनता त्रस्त झाली होती. छगन मामा नुसतेच नावालाच सरपंच होते. कारभारी दुसरेच! त्यामुळे गावात विकास कामे झाली नाहीत. गावात रस्ते नाल्या नाहीत . जानेफळ समस्येने ग्रासले आहे . निवडणुकीत प्रचारात पाणी पाणी करणारे नेतेच सत्ता असतांनी पाणी पाजु शकले नाहीत. तर आता काय जनतेला पाणी पाजणार अशी गल्ली बोळात चर्चा सुरू आहे.
त्यामुळे लवकरच निवडणुकीत नेते कसा एकमेकांवर चिखलफेक
करतात. ते पाहू ….