spot_img

असोला बु येथील डेंग्यूसदृश तापीमुळे युवकाचा मृत्यू.

चिखली (एकनाथ माळेकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)

चिखली तालुक्यातील असोला येथील कुणाल गजानन चव्हाण वय वर्ष 12 यांचा संभाजीनगर येथील एमजीएम हॉस्पिटल येथे डेंग्यूसदृश तापीमुळे मृत्यू झाला असल्याचे बोलल्या जात आहे. आसोला बु येथे पहिलेच डेंगूच्या बाबतीत चर्चेत असतानाच परत एकदा बारा वर्षाच्या युवकाचा संभाजीनगर येथे मृत्यू झाला असल्याने त्यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले .

कुणाला वर्ग सातवी मध्ये आसोल बु‌ येथे मराठी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत होता एक हासत मुख विद्यार्थी तसेच कोणत्याही खेळात प्रवीण असलेला विद्यार्थी मृत्यूमुखी झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

चिखली येथे दोन दिवस व संभाजीनगर येथे तीन दिवस औषध उपचार सुरू असताना डेंगू सदृश्यतापीमुळे युवकाचा मृत्यू झाले असल्याची गावात चर्चा सुद्धा सुरू आहे .

चिखली येथे डॉक्टर धनवे यांच्या येथे उपचार घेत असताना डॉक्टर धनवे यांनी त्यांना संभाजीनगर येथील एमजीएम हॉस्पिटल येथे ताबडतोब हलवण्याचे सांगितले होते .

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या