spot_img

मेहकर पोलिस व एलसीबी ने ट्रक चोराच्या मुसक्या आवळल्या संभाजीनगर वरून चोरट्याना मुद्देमाल सहित सहा चोरटे जेरबंद.

मेहकर (अनिल मंजुळकर.रोखठोक न्यूज वृत्त सेवा ) 

मेहकर येथील डोणगाव रोडवर स्थित असलेल्या वरद सर्वो पेट्रोल पंपावर उभा असलेला ट्रक चोरट्यानी चोरून नेल्याची घटना 25 अक्टोबर रोजी उघडकीस आली होती यावर मेहकर पोलिसांनी तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे तपास करत अवघ्या दोन दिवसात ट्रक सहित चोरटे जेरबंद केले.

मेहकर येथील वरद सर्वो पेट्रोल पंपावर उभा असलेला एम एच 30 ए व्ही 1134 ट्रक हा अज्ञात चोरट्यानी 25 अक्टोबरच्या रात्री चोरून नेला होता त्या प्रकरणी ट्रक मालक फैजल शाह अय्याज शाह रा मेहकर यांनी मेहकर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती त्यावर ठाणेदार राजेश शिंगटे यांच्या मार्गदर्शन मध्ये पोलीस उपनिरीक्षक सय्यद हारून व त्यांच्या पथकाने सिसिटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती व गुप्त माहितीदार यांच्या साहाय्याने तपास करत संभाजीनगर येथून सैय्यद जुनेद सैय्यद अहेमद वय वर्ष रा. गारखेडा परीसर औरंगाबाद,सादीक शेख जानी वय ३० वर्ष युसुफ कॉलनी शणी मंदीर जुना जालना रोड जालना.

इरफान खान अय्युब खान वय २२ वर्ष रा. रोशन गेट अरौरंगाबाद,सैय्यद सिंकदर सैय्यद अब्दुल मन्नान वय ३४ वर्ष रा. आझाद चौक औरंगाबाद,अकबर शाह इसाक शाह वय २७ वर्ष रा. दुखी नगर जालना,सैय्यद समीर सैय्यद नासीर वय ३१ वर्ष रा. शाहगंज बाजार औरंगाबाद यांना अटक केली तसेच ट्रक चोरतांना वापरलेले वाहन महिंद्रा कार सिल्व्हार रंगाची एम एच 28 व्ही 4700 अंदाजे किंमत 5 लाख रुपये व लीलाण्ड कंपनीचा चोरीस गेलेला ट्रक अंदाजे किंमत 10 लाख रुपये असा ऐकून 15 लाखाचा ऐवज चोरट्या जवळून हस्तगत केला या मध्ये 6 चोरट्याना पकडण्यात पोलिसांना यश आले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या