मेहकर — (उद्धव फंगाळ. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)
राहेरी बु गावांमध्ये नेत्यांना गावबंदीचे फलक झळकले असून आमदार, खासदार नेते व पुढारी यांना गाव बंदी करण्यात येत आहे. विनाकारण आमच्या गावात येऊन अपमान करून घेवू नये असे फलक दिसुन येत आहे,
राहेरी बु गांवाच्या प्रवेशद्वारावर फलक लावून नेत्यांना गावबंदी आक्रमक भूमिका घेतल्याने आरक्षणाचे आंदोलन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी होण्याची शक्यता आहे.मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांना लढा उभारला असून या लढ्याला मराठा समाजाकडुन मोठा पाठिंबा मिळत आहे.
राहेरी बु गावात लोकप्रतिनिधी नेते व कार्यकर्त्यांना गावबंदीचे फलक लावले आहेत.त्यामुळे लोकप्रतिनिधीचे अधिकच कोंडी होण्याची शक्यता आहे,गाव बंदी आता तालुक्यामध्ये पसरण्याची शक्यता आहे,त्यामुळे तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये राजकीय नेत्यांना मराठा समाज बांधव प्रवेश देणार का? हेच पाहावे लागणार आहे.मराठा समाज बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.त्यामुळे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात नेत्यांना प्रवेश देणार नसल्यांचे राहेरी बु येथील ग्रामस्थांनी निर्णय घेतला आहे.
यावेळी ग्रामस्थ मदन देशमुख यावेळी बोलताना सांगितले की जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याच पक्षाच्या नेत्यांना गावामध्ये येऊ नाही,अन्यथा गावांमध्ये आल्यास त्यांचा अपमान करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला ग्रामस्थांचा पाठिंबा असल्याचे सुद्धा यावेळी त्यांनी सांगितले.