मेहकर (अनिल मंजुळकर.रोखठोक न्यूज वृत्त सेवा)
किशोरावस्था हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा टप्पा असतो. वयात येत असतांना मुलीच्या जीवनातील हा काळ त्यांच्या भावी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. पौगंडावस्थेच्या या काळात मुलीमध्ये मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्यांचे योग्य निराकरण न झाल्यास शारीरिक, मानसिक रोगांचे प्रमाण वाढू शकते म्हणून किशोरवयीन मुलींनी आरोग्य, आहार आणि स्वच्छतेबाबत विशेष दक्षता घ्यावी असे मत स्त्री रोग तज्ञ डॉ. स्नेहा गडाख यांनी व्यक्त केले. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर श्री शिवाजी हायस्कूल जानेफळ येथे २३ आक्टोंबर रोजी आयोजित आरोग्य मार्गदर्शन, एक दिवसीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी शिक्षीका पुनम छापरवाल तर प्रमुख मार्गदर्शक समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. स्नेहा गडाख, डॉ. ज्योती दिवटे, डॉ. शुभांगी टनमने, डॉ. धनश्री राऊत, आरोग्य सेविका जेऊघाले , पुजा राऊत ,कमल पद्मने , गावंडे उपस्थित होत्या .
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र जानेफळ यांचे सहकार्याने ११० मुलीची रक्ततपासणी करण्यात आली. तदनंतर मुलींना कुमार अवस्थेतील शरीरात होणारे बदल, शाररीक स्वच्छतेचे महत्त्व, मासीक पाळी, त्याचे विज्ञान, समतोल व पौष्टीक आहार म्हणजे काय ? व त्याचे महत्व, फास्ट फूड, जंक फूड चे दुष्परिणाम, झोपेचे नियमन व स्वास्थ, व्यायामाचे महत्त्व तसेच ध्यानधारणा व मानसिक आरोग्य यांचा सहसंबध, बाल विवाहाचे परिणाम, तसेच लैगिक छळ झाल्यास कोणाची मदत घ्यावी, स्त्री विषयक कायदे व हक्काची माहीती, मुलींनी भविष्यासाठी सक्षम असले पाहीजे इत्यादी विषयाबाबत मार्गदर्शन केले. चर्चासत्रामध्ये मुलींनी आपले प्रश्न डॉक्टरांसमोर मांडले . सदर कार्यक्रम संस्थाध्यक्ष सागर देवकर यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका रंजना देशमुख यांनी तर संचलन सरला तुपकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवाणी अवचार, धनश्री करदळे, कोमल देशमाने, ज्योती गायकवाड यांनी परीश्रम घेतले.