spot_img

तो ‘शासन निर्णय रद्द करण्यासाठी मेहकर तहसीलदार यांना निवेदन, काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन – देवानंद पवार

 

मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)

बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगामुळे प्रचंड नुकसान शेतकऱ्याचे झालेले आहे. तेव्हा शासनाने त्याबाबतीत त्वरित सर्वे करून दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी या मागणीसाठी मेहकर तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.

तसेच शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून धनाड्या व्यक्तींना त्या चालवण्यासाठी घेतलेला निर्णय तसेच बेरोजगार युवकांना नोकऱ्या व व्यवसाय न देता त्यांना कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करणे हे दोन्ही शासन निर्णय रद्द करावे यासाठी मा मुख्यमंत्र्यांना मा तहसीलदार मेहकर यांच्या मार्फत आपल्या काँग्रेस पक्षाकडून दिनांक 18 ऑक्टोबर रोजी बुधवारी दुपारी 11 वाजता निवेदन देण्यात येणार आहे

तेव्हा तालुक्यातील पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध विभाग व सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास हजर राहावे असे आवाहन मेहकर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष देवानंद पवार यांनी केले आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या