मेहकर (जमीर शहा. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)
जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी मेहकर नगर पालिकेला 14 तारखेला भेट दिली असता मुख्यअधिकारी तथा प्रशासक हजर नव्हते अश्यात जिल्हाधिकारी यांच्या प्रश्नाची उत्तरे देण्याची जवाबदारी ही उपमुख्यअधिकारी व बांधकाम अभियंता यांच्यावर आली. घामाघूम कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना मेहकर नगर पालिका व परिसर दाखवले अश्यात पालिके समोरील अतिक्रमण इमारत बद्दल जिल्हाधिकारी यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना फटकारले .
त्यामुळे एकच खळबळ सुरू झाली.
मेहकर येथे 14 अक्टोबर रोजी 11 वाजता दरम्यान जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी भेट देऊन पाहणी केली असता मुख्यअधिकारी हे गैरहजर होते तेव्हा जिल्हाधिकारी यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची वेळ उपमुख्य अधिकारी तथा बांधकाम अभियंता यांच्यावर आली असता जिल्हाधिकारी यांनी नगर पालिकेच्या समोरील अतिक्रमण कधी काढणार तर शहरात झाडे लावाचा संदेश देणाऱ्या मेहकर नगर पालिके समोरील स्वातंत्र्य मैदानावर झाडे का लावली नाहीत असे विचारले असता उपमुख्य अधिकारी यांनी झाडे लावलेली आहेत असे सांगितले
तेव्हा ती झाडे कुठं आहेत ते दाखवा असे विचारल्यावर निरुत्तरीत साहेब घामाघूम झालेले होते अश्यात नगर पालिकेच्या वरच्या मजल्यावरील पडायला झालेल्या पीओपी कधी काढणार असे विचारले तर त्या सोबतच दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता गुलाब शेळके यांना नगर पालिकेला वॉल कंपाउंड करून देण्याचे आदेशीत केले तर तुम्ही जनतेच्या आरोग्याकडे लक्ष द्या जनतेला उपोषणास बसण्याची वेळ येऊ देवू नका असे सांगितले .जिल्हाधिकारी यांच्या बोलण्यातून तीव्र नाराजी दिसून येत होती.
हे विशेष
नगर पालिकेच्या अध्यक्षाचा कार्यकाळ संपला व नगर पालिकेवार तहसीलदार हे प्रशासक म्हणून नियुक्त केल्या गेले होते मात्र तहसीलदार संजय गरकल यांची बदली झाली व मेहकर नगर पालिकेचा कारभार मुख्य अधिकारी हेच प्रशासक म्हणून काम पाहत आहेत अश्यात मुख्य अधिकाऱ्यावर प्रशासकाचा अंकुश राहतो तो मेहकर नगर पालिकेत राहिलेला नसल्याने येथील कामकाजावर त्याचा परिणाम होतं असल्याची चर्चा जनता व प्रशासनात रंगलेली दिसून आली.