मेहकर ( अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)
तालुक्यातील जानेफळ येथील डोक्यात ताप जाऊन दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना 11 तारखेला घडली. यश आशिष मेतकर असे या मुलाचे नाव आहे. त्याच्यावर संभाजीनगर येथे उपचार सुरू होते.
यशला सात-आठ दिवसापासून ताप आला होता. स्थानिक जाणेफळ येथील सरकारी दवाखान्यात भरती करुन सलाईन देण्यात आले होते. ताप कमी होत नसल्यामुळे यशला खाजगी दवाखान्यात जाणेफळ व मेहकर येथे भरती करण्यात आले होते. तब्येतीमध्ये सुधारणा होत नसल्याकारणाने यशला संभाजीनगर येथे भरती करण्यात आले होते. यश च्या मेंदूत ताप गेल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
उपचाराला हवा तसा प्रतिसाद देत नसल्याकारणाने उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. सायंकाळी सहा वाजे दरम्यान जानेफळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. एकुलता एक मुलगा असल्याकारणाने जानेफळ परिसरात व्यक्त केली जात होती.
जानेफळ बनले समस्याचे माहेरघर , प्रशासक नावालाच !
मेहकर तालुक्यातील दोन नंबरची जानेफळ ग्रामपंचायत समजली जाते. जानेफळ मध्ये पाण्याची समस्या, नाल्यांची साफसफाई नाही. लाखो रुपये खर्च करून गावात लाईट लावली आहेत .ती बंद अवस्थेत आहे. बसस्थानकावर संध्याकाळी अंधाराचे साम्राज्य . बाजारात घाण , ग्रामपंचायत प्रशासक फक्त हा नावालाच आहे. संपूर्ण अधिकार असताना गावात उपयोजना नाहीत . ठेकेदारीच्या भरोशावर कामे करणारा प्रशासकावर कोणताच वचक राजकीय नेत्यांचा नाही.
आरोग्य विभागाने ग्रामपंचायतला योजना करण्यासाठी पत्र दिलेले आहे तरीही त्याची अंमलबजावणी होत नाही. आतापर्यंत एकाही ठिकाणी धूर फवारणी गावात झाली नाही. प्रशासक म्हणतात गावात भरपूर धुर फवारणी झाली फक्त फोटो सेशनपूर्तीच हे सुद्धा महत्त्वाचे !
घाणीचे साम्राज्य पाहता येथील रहिवाश्याचे आरोग्य हे वाऱ्यावर असल्याचे दिसून येते कित्येकांना डेंग्यू तर काहींना डेंग्यू सदृश्य तापेने ग्रासलेले आहे मात्र यावर ग्रामपंचायतही तेवढीच जबाबदार आहे . सोबतच आरोग्य विभाग गप्प आहे . आरोग्य विभागाने जातीने लक्ष घालावे अशी मागणी जोर धरत आहे.