खामगांव:-(संदिप राठोड. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)
तालुक्यातील लाखनवाडा जयरामगड रोडवर जंगलालगत असलेल्या शेतात काम करत असतांना शेतात लपलेल्या रोहिच्या पिल्लावर कुत्र्यांनी हल्ला चढवला, कुत्रे मागे लागल्याने रोहीचे पिल्लु जिवाच्या अखाताने पळत सुटले.त्याच शेतात काम करीत असलेल्या मजुरांना रोहीच्य पिल्लाचे आवाज येताच सर्व मजुर त्या पिल्लाला वाचविण्यासाठी आवाज येणाऱ्या दिशेने पळाले.जिवाच्या आकांताने धावणाऱ्या पिल्लाला कसे करून कुत्र्यांच्या तावडीतून वाचविण्यात यश आले.
तिथे शेतातच काम करीत असलेल्या पत्रकार संदीप राठोड व गावातील तुलसीदास राठोड यांनी वनपाल यांना भ्रमणधवनी वर संपर्क साधुन त्यांना तातडीने बोलावून घेऊन रोहीच्या त्या पिल्लाला जखम झालेल्या ठिकाणी मलम पट्टी करून त्या पिल्लाला जंगलात सुखरूप सोडण्यात आले. कुत्र्यांच्या तावडीतून सोडविणारे वन्यप्राणी प्रेमी
कुत्र्यांच्या तावडीतून सोडविणारे वन्यप्राणी प्रेमी
विनोद जाधव,राजेश ठक,महादेव वावगे,संजय ठक, अमरदिप राठोड,गणेश जाधव, प्रविण अढाव, सुनिल ठक,विजय राठोड (भोला)अविनाश ठक यांनी अथक प्रयत्न करून पिल्लाला सोडविले. व तसेच वनपाल पि.के.गवई, शिपाही कारेगावकर (ला×वाडा खु.) शिपाही नायकोडे (पिंपरी धनगर) यांनी रोहीच्या पिल्लाला मलम पट्टी करून जंगलात सोडुन दिले.