मेहकर (फिरोज शहा. रोखठोक न्यूज वृत्त सेवा )
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा माजी आमदार ऍड. जयप्रकाश बाविस्कर,राज्य उपाध्यक्ष तथा संर्पकअध्यक्ष विठ्ठल लोखंडकार,जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव,शेतकरी सेना जिल्हा संघटक शैलेश गोंधणे यांच्या प्रमुख उपस्थितित मेहकर विधासभा आढावा बैठक पार पडली.
मेहकर शहरातील बडा राममंदिर येथे सदर आढावा बैठक घेण्यात आली,या वेळी सर्वप्रथम मेहकर व लोणार तालुक्यातील पदाधिकारी यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर माजी आमदार बाविस्कर यांनी मेहकर विधानसभा मतदार संघातील दोन्ही तालुकाध्यक्ष, तालुकाउपाध्यक्ष,तालुका सचिव,शहराध्यक्ष व तालुक्यातील सर्व शाखा अध्यक्ष यांच्याशी सवांद साधत त्यांच्या सूचना व समस्या ऐकून घेतल्या,नंतर आपले विचार व्यक्त करतांना माजी आमदार बाविस्कर म्हणाले की सध्या महाराष्ट्र राज्यात वैचारिक आणि आर्थिक अश्या दोन्ही प्रकारचे भ्रष्टाचार वाढले आहेत
,राजकीय निष्ठा राहिलेली नाही कोण कधी कोणत्या पक्षात जातो हेच कळत नाही या सर्वांना येणाऱ्या काळात मतदानाद्वारे जनता उत्तर देणार आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक यांनी प्रत्येक घरोघरी जाऊन पक्षप्रमुख राज साहेब ठाकरे यांचे विचार घरोघरी पोहचवा असे आवाहन त्यांनी केले.या वेळी जिल्हा संपर्क अध्यक्ष विठ्ठल लोखंडकार म्हणाले की येणारी लोकसभा निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वाबळावर लढवनार असून सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनीकांनी पुर्ण ताकदिने तयार रहावे.जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव म्हणाले की महाराष्ट्र राज्यातील जनता आता परिवर्तन घडविन्याच्या विचारात असून बुलढाणा लोकसभा मतदार संघातील जनता ही आता सत्तेत असलेल्या नेत्यांना घरी बसविल्या शिवाय राहणार नाही,
या प्रसंगी शेतकरी सेनेचे जिल्हा संघटक शैलेश गोंधणे,लोणार तालुकाध्यक्ष गणेश सातपुते,मेहकर तालुकाध्यक्ष संतोष अंभोरे,मेहकर विधानसभा अध्यक्ष राजेश खोरणे,लोणार शहराध्यक्ष पंढरी मापारी,लोणार तालुका उपाध्यक्ष आकाश चाटे,मेहकर शहराध्यक्ष शत्रुघुन चेके,शेतकरी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश मानघाले,शेतकरी सेना मेहकर तालुकाध्यक्ष संजय जाधव,शेतकरी सेना लोणार तालुकाध्यक्ष बद्रीनाथ गावडे, रस्ते आस्थापना विभागाचे जिल्हाउपाध्यक्ष राजेश आखरे आदिनी आपले विचार यावेळी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फ़िरोज़ शाह यांनी केले तर आभार शंकर जाधव यांनी व्यक्त केले.