spot_img

मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथे बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापन

 

वाशिम:(फुलचंद भगत. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)

थायलंड देशातून मिळालेली विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठान मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथे करण्यात आली.सदर मुर्ती ही ६ फुट उंचीची,३५० किलो वजनाची, अष्टधातून मिश्रित असून, ह्या मूर्तीची प्रतिष्ठापनासाठी भारतातील व विदेशातून आलेला भिकू संघ ऊपस्थीत होते.भिक्कु संघाच्या हस्ते ही मुर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली.यावेळी पूजनीय भदंत बोधी पालो महास्थवीर,कश्यप महाथेरो, पंडितो महाथेरो,खामसिंग

महाथेरो, पूजनीय भदंत धम्मानंद,. पूजनीय भदंत विनयशील,पूज्यनीय भदंत बोधीरत्न,पूजनीय भदंत बी. राहूलो, पूजनीय भदंत उपाली,पूज्यनीय भदंत विश्वजीत,पूजनीय भदंत बुद्ध शील, पूजनीय भदंत इंदवंस,पूजनीय भदंत बुद्धघोष,पूजनीय भदंत .विद्यारत्न, पूजनीय भदंत रत्न कीर्ती,पूजनीय भदंत धम्म रत्न,पूजनीय

भदंत कुलदीप या सर्व देश विदेशातून आलेला भिकू संघाचे आगमन सकाळी ९ वाजता वनोजा झाले. त्यांचे स्वागत भव्य रॅली काढून करण्यात आले तसेच तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी वाशिम जिल्ह्यातील व इतरही जिल्ह्यातील श्रद्धावान उपासक उपाशी का सर्व धर्मीय या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले. या मंगलमय वातावरणामध्ये मोठ्या उल्हासात विदेशी भिकूचे स्वागत सत्कार करण्यात आला या गावांमध्ये नवेस्तर वाशिम जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने विदेशातील भंते संघ दाखल झाला ही वनोजासाठी अभिमानाची गोष्ट आहे,. यावेळी अकरा वाजता त्यांना भोजनदान देण्यात आले.नंतर ११.४५ ला मूर्तीची स्थापना करण्यात आली.

 

१.१५ वाजता धम्मदेसना सुरुवात झाली या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले भिकू संघातील पूज्यनीय भदंत बोधिपालो महास्थवीर उपसंगनायक अखिल भारतीय भिकू संघ बोधगया बिहार संस्थापक अध्यक्ष लोकत्तुरा महावीरा चौका औरंगाबाद. यांनी मौलिक बुद्ध प्रवचन केले.हा भव्य दिव्य सोहळा आदर्श ग्राम वनोजा येथे पहिल्यांदा पार पडला या मंगलमय सोहळ्याला वाशिम जिल्ह्यातील श्रद्धावान उपासक उपाशी का बुद्ध अनुयायी प्रत्येक धर्मीय अंदाजे तीन हजार जनसमुदाय आवर्जून उपस्थित होता.

तसेच समता सैनिक दलाचे सैनिक यांनी भिक्खू संघास मानवंदना दिली भिकूंनी धम्मदेशनी मधून मानवतेचा संदेश दिला समानतेचा संदेश दिला बहुजन हिताय बहुजन सुखाय हे मौलिक विचार मांडले, सर्व धर्मीयांनी एकोप्याने नांदावे, वाईट विचाराचा वाईट आचाराचा त्याग करावा. आपल्या धम्मदेसना माध्यमातून सर्व मानव जातीचे कल्याण व्हावे हा संदेश दिला. तथागत बुद्धाचे आचार विचार सर्वतोपरी प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याची काळाची गरज आहे.

अशाप्रकारे सर्व भिकू संघांनी आपापल्या धम्मदेशनी मधून मौलिक संदेश दिला. सरते शेवटी कार्यक्रमाची सांगता व समारोप करण्यात आला.त्यानंतर भिकू संघास सर्व बुद्ध अनुयायांनी निरोप दिला.या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन. पंचशील महिला मंडळ वनोजा, विशाखा महिला मंडळ, सम्राट अशोक नवयुवक मंडळ, सर्व आदर्श ग्राम वनोजा येथील श्रद्धावान उपासक उपासिका बाल बालिका, समस्त गावकरी यांनी केले होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या