मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा )
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील साबरा शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान कारवाई करत ८ लाख ४० हजार रुपयांच्या गांजा सह लोखंडाचा चुरा घेऊन जाणारा ट्रक जप्त केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावर ही पहिलीच मोठी कारवाई होत आहे या कारवाईत पोलिसांनी जालना येथील ट्रक चालक अब्दुल रशीद वय ३२ रा.जाफर चाळ , जुना जालना. आणि सहचालक मोहम्मद अबीद मोहम्मद सादीक वय३५ रा. आलेगाव ता. पातुर जि. अकोला या दोघांना ताब्यात घेतले आहे. एम एच २६ बीई ०८५१ क्रमांकाच्या ट्रक मध्ये नेण्यात येत असलेल्या लोखंडाच्या चोरीमध्येहा ४२ किलो गांजा लपवून ठेवला होता. गोपनीय माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी साजरा शिवारातील मेहकर एक्झिट पॉईंट वर ही कारवाई केली.
या कारवाई दरम्यान पथकासही पाचारण करण्यात आले होते. मेहकर नायब तहसीलदार नितीन बोरकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. पोलिसांनी साडेआठ लाख रुपयांचा व १५ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 23 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल कारवाईदरम्यान जप्त केला आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे लांडे यांच्यासह एपीआय विलास कुमार सानप, पीएसआय सचिन कानडे, दीपक लेकुरवाळे,शरद गिरी , गणेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.