जानेफळ (अनिल मंजुळकर . रोखठोक न्यूज वृत्त सेवा )
जानेफळ परिसरातील जनतेला दुग्ध व्यवसायाला चालना मिळण्यासाठी व बचत गटामार्फत महिलांना कर्ज वाटप करून व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि राजर्षी शाहू पतसंस्थेचा ग्राहक मेळावा आज जानेफळ येथे दुपारी 2वाजता आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक अष्टविनायक परिवाराचे डॉक्टर धनराज राठी, कार्यक्रमाचे अध्यक्ष संकल्पक वन बुलढाणा मिशन चे संदीप दादा शेळके व प्रमुख उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष गजानन तात्या कृपाळ, माजी सरपंच छगन मामा हिवराळे, शिवसेना उपतालुकाप्रमुख विश्वासराव सवडतकर , अंबिका अर्बनचे अध्यक्ष मोहन धोटे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सागर देवकर , तुळजाई पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. केशव अवचार , माजी सरपंच सुरेशभाऊ वडणकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ तोंडे, संत ज्ञानेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष माधवराव आरसोडे , बुलढाणा जिल्हा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू देशमुख, कासारखेड येथील सरपंच प्रदीप मवाळ ,
काँग्रेसचे तालुकाप्रमुख देवानंद पवार, डॉक्टर प्रवीण देशमुख, जानेफळ नगरीचे माजी उपसरपंच गणेश पाखरे , माजी तंटामुक्ती अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते कृष्णा हावरे, शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक गवारे, उटी येथील सरपंच सुरेश काठोळे, महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेचे गजानन मेटांगळे, ज्येष्ठ पत्रकार सय्यद महबूब, दैनिक देशोन्नती तालुका प्रतिनिधी अमर राऊत, उन्नतीचे संपादक गजानन दुतोंडे ,
रोखठोक न्यूज चे पत्रकार अनिल मंजुळकर व ठाणेदार प्रवीण मानकर यांची उपस्थिती राहणार असुन बहारदार व दणक्या आवाजात सूत्रसंचालन तंत्रस्नेही शिक्षक विजय मोंढे सर व कृष्णा हावरे सर करणार आहेत. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती लावावी असे राजर्षी शाहू परिवाराच्या अध्यक्षा मालती ताई शेळके व समस्त जानेफळ येथील संचालक मंडळाने व कर्मचारी वर्गाने केले आहे.