spot_img

उघड्यावर होत असलेली मास विक्री व अतिक्रमण यासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाची आमदार संजय रायमुलकर यानी केली सांगता. ….. उघड्यावर होणारी मास विक्री बंद करण्यासाठी नगरपालिका सज्ज , सर्वच स्तरांतून उपोषणाला पाठिंबा !

मेहकर ( अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)

मेहकर चे
आराध्य दैवत श्री शारंगधर बालाजी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर उघड्यावर होत असलेली मास विक्री तसेच श्री क्षेत्र ओलांडेश्वर मंदिर समोर असलेली अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावी या मागणीसाठी शारंगधर बालाजी मंदिराचे विश्वस्त व भक्तांनी नगरपरिषद कार्यालय समोर दोन ऑक्टोबर पासून सुरू केलेले बेमुदत आमरण उपोषणाची नगरपरिषदेने पाच मागण्या पैकी चार मागण्या पूर्ण करत एक मागणी लेखी आश्वासन दिल्यामुळे उपोषणाची सांगता करण्यात आली महत्त्वाची बाब म्हणजे उघड्यावर होत असलेली मास विक्री व नगरपरिषदेच्या कॉम्प्लेक्स मध्ये होत असलेली मास विक्री कायमस्वरूपी बंद झाली पाहिजे व नगर परिषदेने याचा ठराव सुद्धा घेतला पाहिजे अशा प्रकारचा उपोषणकर्त्यांचा महत्त्वाचा प्रश्न निकाली लागला आहे व नगरपरिषदेने तसा ठराव घेऊन सुद्धा दिला आहे आ डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या हस्ते सांगता झाली..

स्थानिक शारंगधर बालाजी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर उघडपणे मास विक्री होत असून दर्शनासाठी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांच्या भावना दुखावल्या जात असून तात्काळ या रस्त्यावरील अतिक्रमण व होत असलेली मास विक्री बंद करावी, तहसील चौक ते श्री बालाजी संस्थान या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे ,श्री बालाजी संस्थान व ओलांडेश्वर मंदिर या रस्त्यावरील असलेले ऑटो रिक्षा स्टॅन्ड व रस्त्यात उभे राहत असलेले वाहनावर कायमस्वरूपी कारवाई करून या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे , महात्मा फुले भाजी मार्केटचे पाच गेट पैकी चार गेटवरील अतिक्रमण काढून नागरिकांसाठी मार्केटचा रस्ता मोकळा करण्यात यावा,

 

या मागण्यासाठी शारंगधर बालाजी मंदिराचे विश्वस्त उमेश मुंदडा हभप भागवत भिसे व संतोष मलोसे यांनी दोन ऑक्टोबर पासून न,प, कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते उपोषणाच्या चौथ्या दिवशी नगरपरिषदेने सदर मागण्या संदर्भात ठराव घेऊन शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये होत असलेली बेकायदेशीर मास विक्री व उघड्यावर होत असलेली मास विक्री कायमस्वरूपी बंद केली आहे

या कारवाईनंतर केवळ अतिक्रमणाचा मुद्दा लेखी आश्वासन दिल्यामुळे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या शुभहस्ते उपविभागीय अधिकारी गणेश गीते, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील ,मुख्याधिकारी रमेश ढगे, श्रीमती कल्पना बाई मुंदडा श्रीमती सुरेखा बाई मलोसे श्रीमती शांताबाई मलोसे सौ पार्वती बाई भिसे या उपोषणकर्त्यांच्या आईच्या आणि आमदार संजय रायमुलकर आणि अधिकारी वर्गांच्या हाताने हे उपोषण त्या ठिकाणी सोडण्यात आले शहरप्रमुख जयचंद बाठीया ॲड संजय सदावर्ते दीपक पांडे डॉ नंदकुमार उमळकर,गोपाळ पितळे , संतोष दादा पवार रवी रहाटे समाधान सास्ते समाधान साबळे नितीन राऊत रामेश्वर भिसे राजू मुंदडा विनोद भिसे संदीप तट्टे राजेश जैयस्वाल श्री राम नवमी उत्सव समितीचे सदस्य दुर्गादास काटे यांच्या उपस्थितीत होते उपोषण कर्ते संतोष मलोसे, शारंगधर बालाजीचे विश्वस्त बबलू मुंदडा ह भ प भागवत भिसे यांना नींबू शरबत देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या